Pune Voter | राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात   | चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक

HomeBreaking Newsपुणे

Pune Voter | राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात  | चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक

गणेश मुळे Apr 11, 2024 10:09 AM

Aba Bagul Pune | नेहमीसारखे तेच ‘यशस्वी कलाकार’ देऊ नका! | जाहीर सभेतून पुणेकरांचा कौल घ्या, मगच पुणे लोकसभेचा उमेदवार ठरवा
Loksabha Election Divyang Employees | लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण
PMC Election Department |  Orders to remove advertisements, banners of parties immediately after issuance of Model Code of Conduct

Pune Voter | राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात

| चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक

 

Pune Voter – (The Karbhari News Service) –  लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024)  महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार संख्येच्या बाबतीत राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर असून तेथे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात जास्त मतदार आहेत. नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा चार जिल्हयांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे.

पुण्यात 82 लाखांहून अधिक मतदार

पुण्याची एकूण मतदार संख्या 82 लाख 82 हजार 363 आहे. तर मुंबई उपनगरची एकूण मतदार संख्या 73 लाख 56 हजार 596 इतकी आहे. ठाण्याची एकूण मतदार संख्या 65 लाख 79 हजार 588, नाशिक जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या 48 लाख 08 हजार 499 इतकी आहे. तर नागपूरची एकूण मतदार संख्या 42 लाख 72 हजार 366 इतकी आहे.

त्नागिरी, नंदुरबार, गोंदिया आणि सिंधुदुर्गात महिला मतदारांची संख्या अधिक

चार जिल्ह्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदार सर्वाधिक आहेत. रत्नागिरीची एकूण मतदार संख्या 13 लाख 03 हजार 939असून यामध्ये 11 तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 6 लाख 31 हजार 012 आहे तर महिला मतदारांची संख्या 6 लाख 72 हजार 916 इतकी आहे. नंदुरबारची एकूण मतदार संख्या 12 लाख 76 हजार 941 असून यामध्ये 12 तृतीयपंथीची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 6 लाख 37 हजार 609 आहे तर महिला मतदारांची संख्या 6 लाख 39 हजार 320 इतकी आहे. गोदिंया जिल्हयातही महिला मतदारांची संख्या जास्त आहे. गोंदियाची एकूण मतदार संख्या 10 लाख 92 हजार 546असून यामध्ये 10 तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 5 लाख 41 हजार 272 आहे तर महिला मतदारांची संख्या 5 लाख 51 हजार 264 इतकी आहे. सिंधुदुर्गची एकूण मतदार संख्या 6 लाख 62 हजार 745असून यामध्ये 1 तृतीयपंथीची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 3 लाख 30 हजार 719 आहे तर महिला मतदारांची संख्या 3 लाख 32 हजार 025 इतकी आहे.

राज्यात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे अशा पाच टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा तयारीला लागली आहे. राज्यात 8 एप्रिल 2024 पर्यंत एकूण 9 कोटी 24 लाख 91 हजार 806 मतदारांची नोंद आहे. यामध्ये 4 कोटी 80 लाख 81 हजार 638 पुरुष मतदार तर 4 कोटी 44 लाख 04 हजार 551 महिला मतदार आणि 5 हजार 617 तृतीयपंथी मतदार आहेत.

5 जिल्ह्यात 30 लाखांहून अधिक मतदा

अहमदनगर, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्यांमध्ये 30 लाखांहून अधिक मतदार आहेत. अहमदनगरमध्ये एकूण मतदार 36 लाख 47 हजार 252 आहेत. सोलापूरमध्ये एकूण मतदार 36 लाख 47 हजार 141 आहेत. जळगावमध्ये एकूण मतदार 35 लाख 22 हजार 289 आहेत. कोल्हापूरमध्ये एकूण मतदार 31 लाख 72 हजार 797 आहेत. छत्रपती संभाजीनगर मध्ये एकूण मतदार 30 लाख 48 हजार 445 आहेत.

बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, रायगड, मुंबई शहर, बीड, सातारा, सांगली आणि पालघर या 10 जिल्ह्यांमध्ये 20 लाखांहून अधिक मतदार आहेत.