Sinhgadh Road Ward Office | धायरी फाटा परिसरातील व्यापारी व पथारी व्यवसायधारक यांच्यावर कारवाई | ८० हजारांचा दंड वसूल केला
| सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत भरारी पथकाद्वारे कारवाई
Pune PMC News – (The Karbhari News Service) – २२ ते २७ सप्टेंबर या कालावधीत सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत भरारी पथकाद्वारे धायरी फाटा परिसरातील व्यापारी व पथारी व्यवसायधारक यांच्यावर कारवाई करण्यात आली. बंदी असलेले प्लास्टिक न वापरणे आणि कचऱ्यासाठी डस्टबिन ठेवण्याबाबत ,स्वच्छता ठेवण्याबाबत सूचना देऊन जनजागृती करण्यात येत आहे. तसेच अस्वच्छता करणारे नागरिक कचरा जाळणारे व्यावसायिक, फुटपाथवर राडाराडा टाकणारे व्यावसायिक यांच्यावर – दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत ८० हजाराचा दंड वसूल करण्यात आला. अशी माहिती सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. (PMC Solid Waste Management)
कारवाई उपायुक्त संदीप कदम, प्रसाद काटकर, सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार यांच्या आदेशान्वये व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक अशिष सुपनार, मंगलदास माने
यांच्या मार्गदर्शना खाली आरोग्य निरीक्षक धनाजी नवले साहेब, दिनेश सोनावणे साहेब, शुभम डोळस, मोकादम महेश लोंढे व सेवक यांनी केली.
अशी करण्यात आली कारवाई
प्लास्टिक: ३
अस्वच्छता : ३
BWG : ३
कचरा जळाने : १
एकूण केस:- १०
एकूण रक्कम:-.८०,०००

COMMENTS