Pune Property Tax | नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात मिळकतकर विभागाला ३०६ कोटींचे उत्पन्न!  | ७४% नागरिकांनी केला ऑनलाईन भरणा

Homeadministrative

Pune Property Tax | नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात मिळकतकर विभागाला ३०६ कोटींचे उत्पन्न! | ७४% नागरिकांनी केला ऑनलाईन भरणा

Ganesh Kumar Mule Apr 30, 2026 9:30 PM

Environmental Accountability And Sustainability | ‘पर्यावरणीय उत्तरदायित्व आणि शाश्वतता’ विषयावर २६ एप्रिल रोजी राष्ट्रीय परिसंवाद
PMC Swimming Pool | पुणे महानगरपालिकेचे जलतरण तलाव झाले फुल्ल!   राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूना देखील तलावाचे आकर्षण 
Pramod Nana Bhangire | संतोष देशमुख हत्येप्रकरणी मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड आणि आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा दया- प्रमोद नाना भानगिरे

Pune Property Tax | नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात मिळकतकर विभागाला ३०६ कोटींचे उत्पन्न!

| ७४% नागरिकांनी केला ऑनलाईन भरणा

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) –  पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाला आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात ३०६ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. २ लाख १९ हजार ४३२ लोकांनी हा भरणा केला आहे. अशी माहिती महापालिका मिळकत कर विभागाचे उपायुक्त रवी पवार यांनी दिली. (PMC Property Tax Department)

पुणे महानगरपालिकेच्या कर आकरणी व करसंकलन विभागामार्फत २०२६-२७ ची मिळकतकर देयके तयार करण्यात आली आहेत. पोस्ट विभागामार्फत त्याचे वितरण करण्यात येत आहे. कर भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मिळकत कराच्या सर्वसाधारण करामध्ये ५ ते १०% सवलत जाहीर करण्यात आलेली आहे. ही सवलत ३१ मे २०२६ पर्यंत लागू राहणार असून, जे नागरिक आपला संपूर्ण मिळकतकर विहित मुदतीत भरतील त्यांनाच या सवलतीचा लाभ मिळणार आहे. असे आवाहन मिळकत कर विभागाने केले आहे. त्यानुसार नागरिकांनी कर भरणा करणे सुरू केले आहे.

१ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत विभागाला ३०६ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. एकूण २ लाख १९ हजार ४३२ नागरिकांनी एवढी रक्कम जमा केली आहे. ३८ हजार ७०७ लोकांनी म्हणजे १८% नागरिकांनी नगद रक्कम भरत भरणा केला आहे. ही रक्कम ३३ कोटी एवढी आहे. ८% म्हणजे १७ हजार ४४४ नागरिकांनी चेक च्या माध्यमातून ५८ कोटी इतका कर जमा केला आहे. तर सर्वात जास्त म्हणजे ७४% अर्थात १ लाख ६३ हजार २६९ इतक्या नागरिकांनी २१५ कोटी रुपये जमा केले आहेत. महिला वर्षी याच कालावधीत १०८ कोटी विभागाला मिळाले होते. मात्र मागील वर्षी पीटी ३ अर्ज भरण्यास मुभा देण्यात आली होती.
—-

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: