Senior citizens: ज्येष्ठ नागरिकांनमुळेच प्रत्येकाच्या जीवनाला एक प्रेरणा व ऊर्जा मिळते   : नगरसेवक बाबुराव चांदेरे

Homeपुणेsocial

Senior citizens: ज्येष्ठ नागरिकांनमुळेच प्रत्येकाच्या जीवनाला एक प्रेरणा व ऊर्जा मिळते : नगरसेवक बाबुराव चांदेरे

Ganesh Kumar Mule Oct 02, 2021 4:09 PM

MP Supriya Sule | Drought in Maharashtra | राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी
Santosh Lalwani ends 10 days fast in support of Ladakh
decisions in the Cabinet meeting | आज १२ सप्टेंबर २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

ज्येष्ठ नागरिकांनमुळेच प्रत्येकाच्या जीवनाला एक प्रेरणा व ऊर्जा मिळते

: नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी व्यक्त केले विचार

    पुणे:  समाजामध्ये वावरताना  ज्येष्ठ नागरिक हा एक मुख्य घटक असतो. ज्येष्ठांशिवाय हा समाज व आपले घर हे अपूर्ण आहे. ज्यांच्या अनुभवाच्या शिदोरीवर आपल्या आयुष्याला एक दिशा मिळाली त्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण आधार रुपी काठी बनवूया. असे विचार नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी व्यक्त केले.

: दरवर्षी ज्येष्ठ नागरिक दिन या कार्यक्रमाचे आयोजन

          राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रभाग क्र. ९ च्या वतीने बाणेर येथील बंटारा भवन या ठिकाणी “ज्येष्ठ नागरिक दिना” निमित्त  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  याप्रसंगी चांदेरे बोलत होते. सन २००६ पासून ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांचे अनुभव आणि विचार यातून मार्गदर्शन घेण्यासाठी तसेच त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी दरवर्षी ज्येष्ठ नागरिक दिन या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या संवादातूनच प्रेरणा घेऊन ज्येष्ठ नागरिकांसाठी बाणेर येथे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आणि नाना- नानी पार्क या वास्तूंची निर्मिती पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून करू शकलो. असे मत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी व्यक्त केले .
         या कार्यक्रमावेळी बाणेर, बालेवाडी , सुस व म्हाळुंगे या परिसरातील एकूण ४०० ज्येष्ठ नागरिकांना सन्मानित करण्यात आले .
          या कार्यक्रमाप्रसंगी बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप मुरकुटे, गणपतराव बालवडकर, उद्योजक जीवन कळमकर, बाणेर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रावसाहेब जाधव, नामदेव तापकीर, सुस गावचे पोलीस पाटील मुरलीधर चांदेरे, अजिंक्य निकाळजे, युवराज कोळेकर समीर चांदेरे, पांडुरंग पाडाळे समीर कोळेकर, अनुराधा कुलकर्णी , सरपंच नामदेवराव गोलांडे, हरिश्चंद्र गायकवाड, मधुकर चांदेरे, संभाजी बालवडकर, बाळासाहेब बालवडकर, सोपान बालवडकर, सुदामराव विधाते इ. मान्यवर उपस्थित होते .
         या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सागर बालवडकर यांनी केले,सूत्रसंचालन नितिन कळमकर यांनी तर आभार प्रदर्शन विशाल विधाते यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0