Savarkar Jayanti | ‘फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन

HomeBreaking News

Savarkar Jayanti | ‘फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन

Ganesh Kumar Mule May 28, 2025 7:41 PM

Savarkar Jayanti | Pune News | पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकरांची खोली कशी आहे? जाणून घ्या 
Swatantra Veer Savarkar | सावरकरांची खोली राहणार दर्शनासाठी खुली
Bandra-Versova sea Link | वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Savarkar Jayanti | ‘फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन

 

Swatantra Veer Savarkar – (The Karbhari News Service) – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त फर्ग्युसन महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले. (Pune News)

सावरकरांच्या क्रांतिकारी कार्याची साक्ष असलेली महाविद्यालयातील ऐतिहासिक खोली क्रमांक 17 नागरिकांसाठी आज खुली ठेवण्यात आली होती.

1902 ते 1905 या कालावधीत विद्यार्थी असताना सावरकर यांचे वास्तव्य या खोलीत होते. या खोलीतूनच ‘अभिनव भारत’ सारख्या संघटनेची पायाभरणी, स्वदेशी चळवळीची सुरुवात, विदेशी वस्त्रांची होळी यांसारख्या क्रांतिकारी उपक्रमांची आखणी करण्यात आली होती. तसेच इथेच त्यांनी ‘सिंहगडाचा पोवाडा’, ‘बाजीप्रभू देशपांडे’ यांसारखी राष्ट्रप्रेरक काव्यरचना केली.

या खोलीत सावरकरांचा अर्धपुतळा, डी.लिट. पदवीचे गणवेश, वैयक्तिक वस्तू आणि दुर्मीळ छायाचित्रांचे संग्रह पाहायला मिळतो. ही खोली आजही अनेकांना देशभक्तीची प्रेरणा देणारे ठिकाण म्हणून ओळखली जाते.

1905 साली विदेशी वस्त्रांची होळी प्रकरणामुळे त्यावेळचे प्राचार्य रँग्लर परांजपे यांनी सावरकरांना वसतिगृहातून वगळले होते, त्यावर लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’मधून जोरदार निषेध केला होता.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीने या खोलीचे जतन केले असून दरवर्षी सावरकर यांच्या जयंती आणि पुण्यतिथीला ही खोली सर्वांसाठी खुली केली जाते.

आजच्या कार्यक्रमात डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष ऍड. अशोक पलांडे, कार्यवाह डॉ. आनंद काटिकर, फर्ग्युसनचे प्राचार्य श्याम मुडे आणि उपप्राचार्य प्रा. स्वाती जोगळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सावरकरांच्या अर्धपुतळ्याला सकाळी पुष्पहार अर्पण करण्यात आला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: