Pune Potholes | पोलिसांची एनओसी असली तरी आवश्यकता असल्याशिवाय स्पीड ब्रेकर बसवू नये | पथ विभागाच्या मुख्य अभियंता यांचे आदेश |खड्ड्याबाबत पथ विभागाचे काय आहे नियोजन!
PMC Road Department – (The Karbhari News Service) – शहरात गेले काही दिवस कधी संततधार तर कधी मुसळधार झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर खडडे पडायला व त्याबाबतच्या तक्रारी यायला सुरवात झालेली आहे. याबाबत पथ विभागाने देखील आपले नियोजन केले आहे. मुख्य अभियंता यांनी बैठक घेऊन विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काम करण्याबाबत आदेश दिले आहेत. पोलिसांची एनओसी असली तरी आवश्यकता असल्याशिवाय स्पीड ब्रेकर बसवू नये. संपूर्ण पावसाळा कालावधीत अत्यावश्यक कारण वगळता कोणत्याही अभियंता संवर्गातील सेवकांच्या रजा मंजूर करण्यात येऊ नये. असे आदेश विभाग प्रमुखांनी दिले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)
पथ विभागाचे काय आहे नियोजन!
१. तक्रार येण्याच्या वाट न पाहता दररोज हद्दीमध्ये फिरून रस्त्यांची पाहणी केली जाणार आहे.
२. पथ विभागाअंतर्गत असलेल्या सर्व रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने दुरूस्त करण्यात येणार आहेत.
३. खचलेले चेंबर वर उचलण्यात येणार आहे.
४. पाणी पुरवठा, ड्रेनेज तसेच मेट्रो विभागाच्या कामामुळे रस्त्यावर पडलेला राडारोडा त्वरित उचलून घेणेबाबत तसेच सदर ठिकाणी चांगल्या गुणवत्तेचे रस्ते तातडीने तयार करणेबाबत संबधित विभागांना कळविण्यात येणार आहे.
५. १२ मी. पेक्षा जास्त रूंदीच्या रस्त्यांवर पावसामुळे आलेली वाळू व खडी तातडीने काढून घेण्यात येणार आहे.
६. पालखी मार्गावरील सर्व कामे तातडीने पूर्ण केली जाणार आहेत.
७. संपूर्ण पावसाळा कालावधीत अत्यावश्यक कारण वगळता कोणत्याही अभियंता संवर्गातील सेवकांच्या रजा मंजूर करण्यात येणार नाही.
८. मायक्रो सरफेसिंगची कामे लवकर पूर्ण केली जाणार आहेत.
९. स्पीड ब्रेकर असलेल्या ठिकाणी पाणी साठून राहत असल्यास पाणी निचरा करण्याची व्यवस्था केली जाणार आहे
१०. अन्य ठिकाणी पाणी साठून राहत असल्यास सदर ठिकाण डांबरीकरणाद्वारे रस्ता सलग करण्यात येऊन पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.
११. स्पीड ब्रेकर बसविण्याबाबत पोलिस विभागाने जरी ना-हरकत पत्र दिले असले तरी रस्त्याच्या तात्रिक बाबींची पाहणी व तपासणी करून सदर ठिकाणी तातडी व आवश्यकता असल्याशिवाय स्पीड ब्रेकर बसवू नये. असे आदेश देण्यात आले आहेत,
१२. केलेल्या सर्व कामांचे रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे.
COMMENTS