Sanjay Raut Pune Tour | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात लवकरच शहर नेतृत्व फेरबदल – खासदार संजय राऊत

HomeBreaking News

Sanjay Raut Pune Tour | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात लवकरच शहर नेतृत्व फेरबदल – खासदार संजय राऊत

Ganesh Kumar Mule Apr 29, 2026 7:50 PM

Pune Congress | महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष तयारीनिशी सज्ज | भाजपचा भ्रष्टाचार आणि पुण्याची दैना याविरोधात मते मागणार
Illegal Construction, Encroachment | अतिक्रमण, अनधिकृत बांधकावर कारवाई करण्याबाबत सरकार गंभीर – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ
Mahesh Patil PMC | उपायुक्त महेश पाटील यांना पुणे महापालिकेत पदोन्नती! | पदस्थापने वरून मात्र संभ्रम 

Sanjay Raut Pune Tour | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात लवकरच शहर नेतृत्व फेरबदल – खासदार संजय राऊत

Shivsena (UBT) Pune – (The Karbhari News Service) –  शिवसेना ही केवळ सत्तेवर अवलंबून नसून तिची खरी ताकद संघटनात आहे, त्यामुळे पक्ष पराभूत होत नाही आणि पुन्हा सत्तेत येण्याची क्षमता राखतो, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. पुण्यातील बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना तळागाळात काम मजबूत करण्याचे आवाहन केले तसेच लवकरच शिवसेना पुणे शहरात पक्षीय स्तरावर बदल करण्याचे भाकीत देखील केले. (Pune Breaking News)

महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्ष सोडून गेलेल्या बहुतांश नगरसेवकांचा पराभव झाल्याचा उल्लेख करत, “मिसिंग लिंक” शोधून जनतेशी पुन्हा नाळ जोडण्यावर त्यांनी भर दिला. येत्या काळात निवडणुका नसल्याने संघटन विस्तारासाठी ही संधी असल्याचेही त्यांनी सांगितले.

सचिन अहिर यांनी पुण्यातील निवडणुकीत पॅनेल पद्धतीचा फटका आपल्याला बसल्याचे मान्य करत, कार्यकर्त्यांनी जिद्दीने काम करण्याचे आवाहन केले. तर वसंत मोरे यांनी मतांची घट असूनही मिळालेला पाठिंबा सकारात्मक असल्याचे सांगितले.

शहरप्रमुख संजय मोरे यांनी पक्ष वाढीसाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्नशील आहोत आणि नव्या जोमाने कामाला लागू असे सांगितले.

दरम्यान, पश्चिम बंगाल संदर्भात बोलताना राऊत यांनी भाजपवर टीका करत तृणमूल काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीचा उल्लेख केला आणि तेथे भाजपला पराभवाचा सामना करावा लागेल, असा दावा केला.

यावेळी व्यासपीठावर शिवसेना खासदार संजय राऊत, संपर्क प्रमुख सचिन अहिर, माजी आमदार महादेव बाबर, राज्य संघटक वसंत मोरे , शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, आणि युवासेना पदाधिकारी तसेच प्रमुख शिवसैनिक उपस्थित होते.

 

‘नमो नमो’ म्हणा आणि पाणी मिळवा!

पुण्यातील पाणीप्रश्नावर बोलताना राऊत यांनी पुणेकरांना उपरोधिक टोला लगावला. ते म्हणाले, “ज्या पुणेकरांनी भाजपला ११९ नगरसेवक निवडून दिले, त्यांना पाण्याचा प्रश्न भेडसावेल असे मला वाटत नाही. त्यांनी फक्त ‘नमो नमो’ म्हणावे, म्हणजे नळाला आपोआप पाणी येईल, असा टोला राऊत यांनी लगावला.

पुणे महापालिकेतील शिवसेना यूबीटीचे एकमेव नगरसेवक आणि गटनेते नितीन गावडे यांच्या कार्यालयाला संजय राऊत यांनी आज भेट दिली. संपर्क  प्रमुख सचिन अहिर, शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे यावेळी उपस्थित होते.

महापौर बंगल्यातील वृक्षतोड असो की विकासाच्या नावाखाली सुरू असलेली जंगलतोड हा पर्यावरणावरील मोठा आघात आहे. ५० लाख झाडे लावण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने स्वतःच्या अंगणातील झाडे तोडली आहेत. ‘आरे’ असो वा नाशिकचा तपोवन, सत्ताधाऱ्यांच्या अशा कृतीमुळेच ‘क्लायमेट चेंज’चे संकट ओढवत आहे, अशी टीका

मुंबईत रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा मुद्दा हा ‘अतिरेक’ असल्याचे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी भाषेची अपेक्षा करणे हा अतिरेक वाटत असेल, तर हे सरकार मराठीच्या संवर्धनाबाबत गंभीर नाही. मुंबई केंद्रशासित करण्याच्या दिशेने हे सरकार पावले टाकत आहे, हेच यातून स्पष्ट होते.”

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधाने करणाऱ्यांना भाजपची ‘पाळलेली पिलावळ’ असे संबोधत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली. “कोश्यारींपासून गायकवाड आमदारांपर्यंत सर्वजण महाराजांचा अपमान करत आहेत आणि मुख्यमंत्री त्याचे समर्थन करत आहेत, हे राज्याचे दुर्दैव आहे,” असेही ते म्हणाले.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: