PMC Contract Employees | पुणे महापालिकेसमोर कंत्राटी कामगारांचा आक्रोश मोर्चा | “कायम करा, समान कामाला समान वेतन द्या” या मागणीसाठी 4 हजार कामगारांचे आंदोलन

Homeadministrative

PMC Contract Employees | पुणे महापालिकेसमोर कंत्राटी कामगारांचा आक्रोश मोर्चा | “कायम करा, समान कामाला समान वेतन द्या” या मागणीसाठी 4 हजार कामगारांचे आंदोलन

Ganesh Kumar Mule Aug 11, 2026 1:26 PM

SRA | पुणे शहरातील एस.आर.ए च्या अर्धवट प्रकल्पाची तपासणी करणार | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
Dr Vijay Kelkar | भारताचे महान अर्थतज्ञ आणि धोरणात्मक सुधारक डॉ. विजय केळकर २०२५ च्या पुण्यभूषण पुरस्काराचे मानकरी
Dy Mayor Parshuram Wadekar | दर महिन्यास होणाऱ्या पहिल्या मुख्य  सभेमध्ये भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले जावे | उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा मुख्य सभेत प्रस्ताव 

PMC Contract Employees | पुणे महापालिकेसमोर कंत्राटी कामगारांचा आक्रोश मोर्चा | “कायम करा, समान कामाला समान वेतन द्या” या मागणीसाठी 4 हजार कामगारांचे आंदोलन

 

PMC Kamgar Union – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका कामगार युनियन मान्यताप्राप्त च्या वतीने सोमवार 10 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता महापालिका प्रवेशद्वारासमोर कंत्राटी कामगारांचा मोठा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. (Pune Municipal Corporation – PMC)

घनकचरा व्यवस्थापनसह सर्व खात्यांतील सुमारे 8 हजार कंत्राटी कामगार 15 ते 20 वर्षांपासून तुटपुंज्या वेतनावर सेवा करत आहेत. त्यांना कायम करावे आणि समान कामाला समान वेतन द्यावे या दोन मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

युनियनचे अध्यक्ष कॉ. उदय भट यांनी सांगितले की, कंत्राटी कामगारांकडून सफाई, कचरा उचलणे, ड्रेनेज साफ करणे, मयत जनावरे उचलणे यासारखी कामे करून घेतली जातात. मात्र त्यांना कायम कर्मचाऱ्यांच्या तुलनेत एक तृतियांशच वेतन दिले जाते. कामाच्या निविदेच्या अटींनुसार ईएसआय, पीएफ, गणवेश, साहित्यही दिले जात नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी कायम करण्याचा प्रस्ताव तयार करून तो स्थायी समिती आणि मुख्य सभेत मंजूर करून शासनाकडे पाठवावा अशी मागणी आहे.

महाराष्ट्र शासनाने 30 जून 2026 रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 15 हजार कंत्राटींना कायम केले. मुंबई, नागपूर आणि नवी मुंबई महापालिकेतही कंत्राटी कामगारांना कायम करण्याचे निर्णय झाले आहेत. त्याच धर्तीवर पुण्यातही निर्णय व्हावा अशी मागणी युनियनने केली.

युनियनच्या जनरल सेक्रेटरी कॉ. मुक्ता मनोहर यांनी कामगारांना एकजूट ठेवून लढा देण्याचे आवाहन केले. नव श्रमिक हक्क आंदोलन आणि विद्यार्थी संघटनेनेही या लढ्याला पाठिंबा दिला.

आंदोलनात 4 हजार कंत्राटी कामगारांसह युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. मागण्या मान्य न झाल्यास कायदेशीर लढा आणि आंदोलन तीव्र करण्याचा इशारा अध्यक्ष उदय भट यांनी दिला.

—

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0