Balbharati Paud Phata Road EC | बालभारती ते पौड फाटा डीपी रोड साठी EC सर्टीफिकिट घेणार महापालिका | सल्लागाराला दिले जाणार दीड कोटी 

Homeadministrative

Balbharati Paud Phata Road EC | बालभारती ते पौड फाटा डीपी रोड साठी EC सर्टीफिकिट घेणार महापालिका | सल्लागाराला दिले जाणार दीड कोटी 

Ganesh Kumar Mule Apr 29, 2026 8:18 PM

PMC Road Department |  पथ विभागाची पॅकेज निविदा विशिष्ट ठेकेदारांसाठी! | माजी नगरसेवकांचा आरोप 
Kothrud Missing Link | कोथरुड मधील मिसिंग लिंक पूर्ण होईपर्यंत भूतासारखा मागे लागेन! | चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून कोथरुड मधील मिसिंग लिंकच्या कार्यवाहीचा आढावा
PMC Road Department | शहरात मानकांप्रमाणे असणारे गतिरोधक किती याची माहिती सर्व्हे नंतरही गुलदस्त्यात | विवेक वेलणकर यांचा महापालिका पथ विभागावर निशाना 

Balbharati Paud Phata Road EC | बालभारती ते पौड फाटा डीपी रोड साठी EC सर्टीफिकिट घेणार महापालिका | सल्लागाराला दिले जाणार दीड कोटी

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – बालभारती ते पौड फाटा हा ३० मी. डी पी रस्ता पुणे महापालिकेच्या वतीने विकसित केला जाणार आहे.  या कामाकरीता सर्वोच्च न्यायालयच्या निर्देशानुसार एनव्हायरोमेंटल क्लिरन्स (EC) सर्टीफिकिट घेणे आवश्यक आहे. हे काम महापालिका सल्लागाराच्या माध्यमातून करणार आहे. त्यासाठी १ कोटी ५१ लाख इतका खर्च येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. यावर उद्याच्या बैठकीत चर्चा होणार आहे. (Pune Municipal Corporation -PMC)

सुप्रीम कोर्ट  च्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेस पौड फाटा ते बालभारती ३० मी डी.पी रस्ता विकसित करण्यासाठी Environmental Clearacne Certificate (EC) तातडीने प्राप्त करणे आवश्यक झाले आहे. हे काम करण्यासाठी तज्ञ सल्लागाराची नेमणूक तातडीने नेमणूक केली जाणार आहे. तसेच नेमणूक केलेल्या तज्ञ सल्लागाराकडून सदर काम मुदतीत पूर्ण करणे आवश्यक आहे. Environmental Clearacne Certificate (EC) शिवाय बालभारती पौड फाटा रस्त्याचे टेंडर प्रक्रिया व जागेवर काम करणे  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शक्य होणार नाही.

रस्त्यासाठी खात्रीलायक काम करणारा तज्ञ सल्लागार नेमणूक करणे जिकिरीचे असल्याने महाराष्ट्र शासनाने/ भारत सरकार यांनी रस्त्याच्या कामासाठी यापूर्वी रस्त्याच्या कामासाठी एन्वायरन्मेंटल क्लीअरन्स (EC) कामी नेमणूक केलेले अनुभवी तज्ञ सल्लागार नेमणूक करणे आवश्यक होते. त्यानुसार बी २ पध्दतीने टेंडर काढणेत आले.  यासाठी  फेर निविदा देवूनही  आदित्य एन्हायरोमेंटल सर्व्हिसेस प्रा.लि. यांची एकच निविदा १,२८,१३,२२३.९२ प्राप्त झालेली असल्याने या निविदेची शिफारस करण्यात आली आहे. जीएसटी सहित हा खर्च १ कोटी ५१ लाख इतका होत आहे.  2026-27 चे अंदाजपत्रकात बालभारती ते पौड फाटा ३० मी.डी पी रस्ता विकसित करणे या कामाकरीता २ कोटी तरतूद उपलब्ध आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: