Naval Kishore Ram IAS | साधू वासवाणी पूल डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करा | आयुक्त नवल किशोर राम यांची पाहणी

Homeadministrative

Naval Kishore Ram IAS | साधू वासवाणी पूल डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करा | आयुक्त नवल किशोर राम यांची पाहणी

Ganesh Kumar Mule Aug 11, 2026 7:15 PM

PMC Traffic Planning Department | पुणे महापालिकेचा स्वतंत्र वाहतूक विभाग | महापालिका आयुक्तांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची केली नियुक्ती 
PMC Encroachment Action | नगर रोड, वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय हद्द आणि गोयल गंगा रस्त्यावरील अतिक्रमणावर महापालिकेकडून जोरदार कारवाई
PMC Security Department | मुख्य लेखा व वित्त विभागाने आक्षेप घेतल्यानंतर पश्चात मान्यतेसाठी स्थायी समिती समोर आणला प्रस्ताव! | जाणून घ्या काय आहे प्रकरण!

Naval Kishore Ram IAS | साधू वासवाणी पूल डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करा | आयुक्त नवल किशोर राम यांची पाहणी

| सप्टेंबरअखेर रेल्वे स्पॅनचे लॉन्चिंग होणार

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) –  पुणे महानगरपालिकेच्या महत्वाकांक्षी साधू वासवाणी पूल प्रकल्पाच्या कामाचा आयुक्त नवल किशोर राम यांनी आज 11 ऑगस्ट  रोजी प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. कामाच्या प्रगतीचा आढावा घेत त्यांनी डिसेंबर 2026 अखेर प्रकल्प पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. (Pune Municipal Corporation – PMC)

प्रकल्पाच्या महत्वामुळे आयुक्त दरमहा प्रत्यक्ष जागेवर जाऊन कामाचा आढावा घेणार आहेत.

रेल्वे स्पॅन हे सर्वात मोठे आव्हान
साधू वासवाणी येथील रेल्वे मार्गावरील सुमारे 54 मीटर लांबीचा Open Web Girder Railway Span हा या प्रकल्पातील तांत्रिकदृष्ट्या सर्वात आव्हानात्मक भाग आहे. या ठिकाणी दररोज 240 पेक्षा अधिक रेल्वेगाड्या धावत असल्याने रेल्वे वाहतुकीची सुरक्षितता अबाधित ठेवून काम करावे लागणार आहे.

या ठिकाणी अडथळा ठरणारी 1 मीटर व्यासाची जुनी ओव्हरहेड पाणीवाहिनी आता भूमिगत करण्यात आली आहे. तसेच विद्यमान ओव्हरहेड ट्रस स्ट्रक्चर काढण्याचे काम नव्याने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराकडून सुरू असून ते एका आठवड्यात पूर्ण होईल. त्यानंतर सप्टेंबरअखेरपर्यंत 54 मीटरच्या Open Web Girder चे Launching करण्याचे नियोजन आहे.

रेल्वे स्पॅनचे काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित तीन स्पॅनची कामे समांतरपणे हाती घेऊन प्रकल्पाला अधिक गती देण्यात येणार आहे. प्रकल्पाची मूळ मुदत 2.5 वर्षे असून प्रत्यक्ष काम सुरू झाल्यापासून या कालावधीत काम पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.

काम सुरू करण्यासाठी वाहतूक पोलीस विभाग आणि रेल्वे विभागाशी आवश्यक समन्वय, परवानग्या आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली आहे.

या पाहणीवेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, मुख्य अभियंता प्रकल्प दिनकर गोजारे, मुख्य अभियंता पथ राजेश बनकर, उपायुक्त आशा राऊत, उपायुक्त संतोष वारुळे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्तांनी तांत्रिक गुंतागुंत, रेल्वे वाहतुकीची व्यस्तता आणि आंतरविभागीय समन्वयाचा आढावा घेत प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला.

साधू वासवाणी पूल पूर्ण झाल्यानंतर पुणे स्टेशन, येरवडा आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: