Pune PMC News | पथ विक्रेता कायद्या बाबत यशदाकडून शहर पथविक्रेता समिती सदस्य व अतिक्रमण निरीक्षक यांना प्रशिक्षण

Homeadministrative

Pune PMC News | पथ विक्रेता कायद्या बाबत यशदाकडून शहर पथविक्रेता समिती सदस्य व अतिक्रमण निरीक्षक यांना प्रशिक्षण

Ganesh Kumar Mule Apr 29, 2026 12:35 PM

Voter List | PMC Election | प्रारुप मतदार याद्या राष्ट्रवादीच्या दबावाखाली | भाजपचा आरोप 
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी उपयुक्त – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
PMRDA Draft DP | पुणे महानगर क्षेत्राच्या प्रारूप रचनेत शहरासाठी आवश्यक बाबींचा समावेश करा | उपमुख्यमंत्री अजित पवार

Pune PMC News | पथ विक्रेता कायद्या बाबत यशदाकडून शहर पथविक्रेता समिती सदस्य व अतिक्रमण निरीक्षक यांना प्रशिक्षण

 

Yashada – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण / अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागामार्फत “पथविक्रेता (उपजीविका) संरक्षण व पथविक्री विनिमय अधिनियम २०१४” या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन २४ एप्रिल रोजी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे करण्यात आले होते. (PMC Encroachment Department)

या कार्यशाळेमध्ये शहर पथ विक्रेता समितीचे सदस्य आणि महानगरपालिकेतील संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी अशा एकूण ४० प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदविला. प्रशिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट पथविक्रेता कायदा २०१४ अंतर्गत तरतुदी, अंमलबजावणी प्रक्रिया, पथविक्रेत्यांचे हक्क व स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी याबाबत सखोल माहिती देणे हे होते.

कार्यशाळेदरम्यान पथविक्रेता अधिनियम २०१४ या मुख्य विषयासोबतच नगर प्रशासनातील संवाद कौशल्ये, आरोग्य धनसंपदा तसेच मनाची अमर्याद शक्ती या विषयांवरही प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना कायदेशीर, प्रशासकीय तसेच वैयक्तिक विकासाच्या दृष्टीने उपयुक्त माहिती मिळाली.

या प्रशिक्षण कार्यशाळेसाठी राजीव नंदकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा संचालक, राज्य नागरी विकास संस्था, यशदा यांनी मार्गदर्शक म्हणून काम पाहिले व प्रशिक्षणार्थ्यांना पथविक्रेता अधिनियम २०१४ आणि पथविक्रेता नियम २०१६ बाबत मार्गदर्शन केले.त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रशिक्षणार्थ्यांना पथविक्रेता कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात व्यावहारिक व उपयुक्त माहिती प्राप्त झाली.

कार्यक्रमाचे उद्घाटन सचिन कलंत्रे (भा.प्र.से.), उपमहासंचालक तथा निबंधक, यशदा यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी यशदा व पुणे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वय साधला.

कार्यशाळेमुळे पथविक्रेता कायद्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांमध्ये अधिक जागरूकता निर्माण होऊन कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीस चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: