Ramesh Shelar News | प्रशासनाने समकक्ष पदात  गल्लत केल्याने अकार्यकारी पद माझ्या माथी! | कार्यकारी पद देण्याची रमेश शेलार यांची मागणी

HomeपुणेBreaking News

Ramesh Shelar News | प्रशासनाने समकक्ष पदात गल्लत केल्याने अकार्यकारी पद माझ्या माथी! | कार्यकारी पद देण्याची रमेश शेलार यांची मागणी

कारभारी वृत्तसेवा Nov 09, 2023 2:11 PM

Post office Or Bank | Investment | पोस्ट ऑफिस किंवा बँक… जिथे पैसे गुंतवून तुम्हाला अधिक फायदा मिळेल |  जाणून घ्या
Sanitation | PMC | पालखी गेल्यानंतर महापालिकेकडून तत्काळ साफसफाई 
Ganesh Utsav 2023 | Pune Metro Timetable | गणेशोत्सव काळात पुणे मेट्रोची  सेवा मध्यरात्री पर्यंत | जाणून घ्या वेळा 

Ramesh Shelar News | प्रशासनाने समकक्ष पदात  गल्लत केल्याने अकार्यकारी पद माझ्या माथी! | कार्यकारी पद देण्याची रमेश शेलार यांची मागणी

Ramesh Shelar News | पुणे | पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागात (PMC Solid Waste Management Department) रमेश शेलार (Ramesh Shelar) हे पर्यावरण व्यवस्थापक (अकार्यकारी) म्हणून काम पाहत आहेत. मात्र अकार्यकारी पद हे प्रशासनाच्या चुकीमुळे माझ्यावर लादले गेले आहे. असे रमेश शेलार यांनी निदर्शनास आणून दिले आहे. माझे पद हे मुख्य सुरक्षा अधिकारी अर्थात खातेप्रमुखाचे होते. मात्र प्रशासनाने सुरक्षा अधिकारी या पदाच्या समकक्ष पद बहाल केले आहे. त्यामुळे मी कार्यकारी पदापासून वंचित राहिलो आहे. त्यामुळे आता तरी प्रशासनाने कार्यकारी पद द्यावे, अशी मागणी शेलार यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. (Pune Municipal Corporation)
अकार्यकारी पद देताना प्रशासनाने चुकीचा संदर्भ दिला आहे, असे शेलार यांनी प्रशासनास याआधीच निदर्शनास आणून दिले आहे. तसेच दोन महिने कार्यकारी पद देऊन पुन्हा अकार्यकारी पद प्रशासनाने दिले, हे माझ्यावरच्या आकसापोटी केले असल्याचा आरोप देखील शेलार यांनी केला आहे. तसेच आता तरी प्रशासनाने आपली चूक सुधारून कार्यकारी पद द्यावे, अशी मागणी शेलार यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे आधीच केली आहे. (Pune Municipal Corporation)
त्यानंतर प्रशासनाला शेलार यांनी दुसरे पत्र दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे कि मुख्य  सुरक्षा अधिकारी” (वर्ग-१) पदावरून अकार्यकारी पदभार समकक्ष पद हे वर्ग- २ “सुरक्षा अधिकारी” या पदाशी समकक्ष यादी तत्कालीन महापालिका आयुक्त यांजकडेस मान्यतेसाठी तत्कालीन अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांचे मार्फत तत्कालीन उपआयुक्त सामान्य प्रशासन विभागामार्फत ठेवली होती. वास्तविक माझी निवड “मुख्य सुरक्षा अधिकारी” (वर्ग – १) पदी सरळसेवेने झालेली आहे व हे पद खातेप्रमुखांचे आहे. (PMC Pune News)
खातेनिहाय चौकशी आज्ञापत्रक ३१/०८/२०१९ रोजी पारित झालेनंतर मी सेवेमध्ये पुर्नस्थापीत झालो.
तदनंतर तत्कालीन उप आयुक्त सामन्य प्रशासन विभागाने समक्ष चर्चा करून (वर्ग-२) पदांची यादी केली. म्हणजेच मला (वर्ग -१) पदावरून (वर्ग -२) समकक्ष पदावरती अकार्यकारी कामकाज सोपविले यामधून मला पुन्हा जबरी शिक्षा केली अशी माझी धारणा झाली आहे. माझी शैक्षणिक अर्हता त्यावेळी D.C.E,BE(old) Civil, L.L.B, अशी होती कारण माझी सन २००९ रोजी सरळसेवा नेमणूक पद “मुख्य सुरक्षा अधिकारी”पदासाठी L.L.B पदवीस प्राधान्य होते म्हणूनच झालेली आहे. ०१/१०/२०१९ चे निवेदनावरती तत्कालीन अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी “GAD मधून हजर करून अकार्यकारी पदावर नियुक्ती देणेबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करणे उचित राहील”. असा शेरा नमूद केलेला आहे. त्यांस तत्कालीन महापालिका आयुक्त यांनी मान्य असे नमूद केलेले आहे.
वास्तविक त्यावेळी मी सेवेमध्ये कार्यकारी म्हणून “मुख्य सुरक्षा अधिकारी” कामकाज पाहत होतो. ‘मानीव निलंबन’ निलंबन झालेले वर्ग -१ चे अधिकारी सेवेमध्ये आलेनंतर कार्यकारी म्हणून कामकाज पहात आहे. एल.बी.टी विभागाने प्रसिद्ध झालेली संकेतस्थळावरील माहिती व प्रमाणपत्र हा त्याचा भाग आहे. या  सर्व प्रकारामुळे माझे सह महापालिका आयुक्त, अतिरिक्त महापालिका आयुक्त चा पदावरती पदोन्नतीचा परिणाम झाला आहे.  तसेच इतर समकक्ष पदावर (मुख्य कामगार अधिकारी, नगरसचिव, मुख्य अभियंता, उप आयुक्त अतिक्रमण व समाज विकास अधिकारी इत्यादी.) सुद्धा कामकाज करता येत नाही. या सर्व गोष्टींचा विचार होऊन “कार्यकारी” पदावरती (वर्ग -१) समकक्ष काम करण्याचे आदेश दिले जावेत. असे शेलार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
—-