Pune Water Supply | पावसामुळे पाण्यात गढूळपणा वाढला |  पिण्यापूर्वी पाणी स्थिर ठेवून तुर्टीने गाळून उकळून प्या

Homeadministrative

Pune Water Supply | पावसामुळे पाण्यात गढूळपणा वाढला |  पिण्यापूर्वी पाणी स्थिर ठेवून तुर्टीने गाळून उकळून प्या

Ganesh Kumar Mule Jul 14, 2026 8:54 PM

Pune Book Festival | ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ उपक्रमाला चांगला प्रतिसाद | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासहित सोसायट्या, शाळा, महाविद्यालये, कार्यालये, गणेश मंडळे, स्वयंसेवी संस्थांचा उपक्रमात सहभाग
Cabinet Meeting | 40% कर सवलत | सवलत कायम राहण्याबाबत उद्या अंतिम निर्णयाची शक्यता! | उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे सर्वांचे लक्ष
Pune PMC News | पर्यावरण संवर्धन अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार गणेश सोनुने यांच्याकडे |  समाज विकास विभागाचा पदभार आशा राऊत यांच्याकडे 

Pune Water Supply | पावसामुळे पाण्यात गढूळपणा वाढला |  पिण्यापूर्वी पाणी स्थिर ठेवून तुर्टीने गाळून उकळून प्या

महापालिका पाणीपुरवठा विभागाचे नागरिकांना महत्वाचे आवाहन

 

Pune Water News – (The Karbhari News Service) – पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये येणाऱ्या कच्च्या पाण्याच्या गढूळतेत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना अतिरिक्त खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. (PMC Water Supply Department)

पुणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी याबाबत निवेदन दिले आहे.

धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे विशेषतः जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात येणाऱ्या पाण्याची घाण प्रकल्पाच्या निर्धारित शुद्धीकरण क्षमतेपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे ती पूर्णपणे नियंत्रित करणे सध्या शक्य होत नाही, असे विभागाने स्पष्ट केले आहे.

तथापि, जलशुद्धीकरण केंद्रातून वितरित करण्यात येणारे पाणी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून पूर्णपणे निर्जंतुकिकरण करूनच नागरिकांना पुरविले जात आहे. पिण्याच्या पाण्यात कोणतेही रोगजंतू राहणार नाहीत याची दक्षता पाणीपुरवठा विभागामार्फत घेतली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
सध्या पाण्याची घाण वाढलेली असल्याने नागरिकांनी पिण्याचे पाणी वापरापूर्वी काही काळ स्थिर ठेवावे. त्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार तुर्टी फिरवून घाण तळाशी बसू द्यावी. त्यानंतर वरचे स्वच्छ पाणी स्वच्छ कापडाने किंवा योग्य फिल्टरद्वारे गाळून उकळूनच पिण्यासाठी वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सिंहगड रस्त्यावरील भागासाठी विशेष सूचना
तसेच, सिंहगड रस्त्यावरील हडपसरीतील गावांना पुरविण्यात येणाऱ्या पाण्यावर केवळ निर्जंतुकिकरणाची प्रक्रिया केली जाते. त्या भागात जलशुद्धीकरण फिल्टर प्रकल्प उपलब्ध नसल्यामुळे संबंधित नागरिकांनी पिण्याचे पाणी आवश्यकतेनुसार तुर्टीचा वापर करून घाण कमी करावी. त्यानंतर ते गाळून व उकळूनच वापरावे, असेही आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

पाणीपुरवठा विभागाने सर्व नागरिकांनी या सूचनांची नोंद घेऊन सहकार्य करावे, अशी विनंती केली आहे. पावसाचा जोर कमी होऊन धरणातील पाण्याची घाण कमी झाल्यानंतर परिस्थिती पूर्ववत होईल, असेही प्रशासनाने सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: