Balbharati Paud Phata Road | बालभारती-पौड फाटा रस्त्याला प्राधान्य देण्याची माजी नगरसेवकांकडून मागणी

Homeadministrative

Balbharati Paud Phata Road | बालभारती-पौड फाटा रस्त्याला प्राधान्य देण्याची माजी नगरसेवकांकडून मागणी

Ganesh Kumar Mule Jul 14, 2026 9:31 PM

Inner Ring Road Pune | इनर रिंग रोडच्या भूसंपादनालाही वेग! ७ लाखांहून अधिक चौ.मी. जमीन संपादित होणार
Pune BJP Vs Pune Congress | पुण्याच्या वाहतुक कोंडीला काँग्रेसच जबाबदार | भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांची टीका
Muralidhar Mohol | विमानतळाच्या मेट्रो मार्गावर शिक्कामोर्तब; तर पौड फाटा ते वनदेवी होणार दुहेरी उड्डाणपूल !

Balbharati Paud Phata Road | बालभारती-पौड फाटा रस्त्याला प्राधान्य देण्याची माजी नगरसेवकांकडून मागणी

 

Pune News – (The Karbhari News Service) – HCMTR अर्थात उन्नत मेट्रो आणि रिंग रोड प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार मानले आहेत. तसेच या रस्त्याच्या आखणीमध्ये पौड फाटा ते बालभारती रस्त्याचाही समावेश आहे. या रस्त्याबत माजी नगरसेवकांनी विशेष मागणी केली आहे. (Pune Breaking News)

या नेत्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अनेक वर्षांपासून राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी रखडलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुख्यमंत्री महोदयांनी प्राधान्याने मार्गी लावला आहे.

पत्रकानुसार, पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि रस्त्यांचे नेटवर्क सुधारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष प्राधान्य दिले. यासाठी त्यांनी एका समितीची स्थापना केली आणि या प्रकल्पाला गती दिली. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी यासंदर्भातील सुतोवाचही केले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

 

“बहुसंख्य जागा सरकारी मालकीची आहे. अनेक ठिकाणी रस्ते झालेलेच आहेत. टीडीआर देऊन देखील आपण जागा ताब्यात घेतलेल्या आहेत. त्यामुळे जेव्हा प्राधान्याने काम सुरू कराल तेव्हा बालभारती रस्ता हा लगेच करता येऊ शकतो. तो प्रथम करावा,” अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री आणि महापालिका प्रशासनाला केली आहे.

HCMTR प्रकल्पामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. उन्नत मार्गासोबत भूपृष्ठावरील रस्ते, सेवा रस्ते, सायकल ट्रॅक आणि पादचारी मार्गांचा देखील यात समावेश आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: