Pune Water Supply | ‘खाजगी टँकरचे दर आवरा, वॉटर बॉडी ताब्यात घ्या’ : मुख्य सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांचा प्रशासनावर हल्लाबोल

Homeadministrative

Pune Water Supply | ‘खाजगी टँकरचे दर आवरा, वॉटर बॉडी ताब्यात घ्या’ : मुख्य सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांचा प्रशासनावर हल्लाबोल

Ganesh Kumar Mule Jun 30, 2026 6:16 PM

Pune PMC News | पुतळा उभारण्यासाठी पारीत केलेले ठराव, ना-हरकत प्रमाणपत्रे वर्षानुवर्षे राहताहेत पडून | पुन्हा नव्याने घ्यावी लागते परवानगी 
PMC GB | लोहगाव अतिक्रमण कारवाईत आर्थिक देवाण घेवाण होत असल्याचा सत्ताधारी नगरसेवकांचा मुख्य सभेत आरोप
PMC Financial Committee | वित्तीय समिती रद्द चा निर्णय आता पक्षनेत्यांच्या कोर्टात!

Pune Water Supply | ‘खाजगी टँकरचे दर आवरा, वॉटर बॉडी ताब्यात घ्या’ : मुख्य सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांचा प्रशासनावर हल्लाबोल

| महापौरांच्या आदेशानंतर अतिरिक्त आयुक्तांनी दिले धोरणात्मक निर्णयाचे आश्वासन

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – शहरातील भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर खाजगी टँकरचालक मनमानी दर आकारत असल्याचा आणि काही ठिकाणी खाजगी बोअरवेलधारकही टँकरसाठी पैसे उकळत असल्याचा आरोप करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आज मुख्य सभेत महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. यावर महापौर मंजुषा नागपूरे यांनी प्रशासनाकडून तातडीने खुलासा मागवला. यावर  अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी खाजगी टँकरवर नियंत्रण व दर कमी करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले. (Pune PMC News)

मुख्य  सभेत अनेक नगरसेवकांनी खाजगी टँकरवाले पाण्यासाठी अव्वाच्या सव्वा दर आकारत असल्याचे सांगितले. “सोसायटीत १० हजार लिटरच्या टँकरसाठी १५०० ते २५०० रुपये मोजावे लागत आहेत. महापालिकेचे नियंत्रणच नाही,” असा आरोप करण्यात आला. काही नगरसेवकांनी खाजगी बोअरवेलमधूनही टँकर भरून पैसे घेतले जात असल्याची तक्रार केली. खाजगी टँकर पूर्णपणे बंद करण्याची मागणीही सदस्यांनी लावून धरली.

यावर महापौर मंजुषा नागपूरे यांनी प्रशासनाला जाब विचारला. “खाजगी टँकर, त्यांचे दर, शहरातील टँकर पॉईंट यावर महापालिकेचे धोरण काय आहे? नागरिकांची लूट होत असताना प्रशासन काय करतेय?” असा सवाल महापौरांनी उपस्थित केला आणि तातडीने खुलासा करण्याचे आदेश दिले.

यावर  अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर म्हणाल्या, “सध्या पाण्याची भीषण स्थिती आहे. धरणात अवघा १२% पाणीसाठा आहे. पालखी सोहळा झाल्यानंतर भामा-आसखेडमधून घेत असलेल्या पाण्यात कपात करावी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.”

प्रशासनाच्या उपाययोजना :

टँकर पॉईंट वाढवणार: आगामी काळात शहरातील टँकर पॉईंटची संख्या ३ ने वाढवत आहोत.  कॅमेऱ्याद्वारे नियंत्रण: टँकरवर कॅमेऱ्याच्या माध्यमातून नियंत्रण ठेवत आहोत आणि त्यावर अजून काम करू.  वेबसाईटवर माहिती: टँकर व टँकर पॉईंटची माहिती महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देऊ.

खाजगी टँकरचे दर कमी करणार: खाजगी टँकर बंद करण्याच्या मागणीवर धोरणात्मक निर्णय घेऊ. तसेच खाजगी टँकरचे रेट कमी करू.

JE ची कमतरता भरणार: JE च्या बदल्या आधीच झाल्या होत्या. सध्या JE ची कमतरता आहे. मात्र १० जुलैपर्यंत नवीन १६९ JE रुजू होणार आहेत, त्यामुळे कमतरता कमी होईल.

खाजगी बोअरवेलवर नियंत्रण: सध्या खाजगी बोअरवेलवर पीएमसीचे नियंत्रण नाही. आगामी काळात यावर देखील नियंत्रण ठेवू.

शेवटी महापौर मंजुषा नागपूरे म्हणाल्या, “खाजगी टँकर आणि बोअरवेलच्या मुद्द्यावर धोरणात्मक निर्णय लवकर घ्यावे लागणार आहेत. ते तातडीने घ्या. तसेच शहरातील सर्व वॉटर बॉडी महापालिकेने ताब्यात घ्याव्यात, जेणेकरून पाण्याचे योग्य नियोजन करता येईल.”

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0