PMC General Body Meeting | पुणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणावर ७ नगरसेवकांची नियुक्ती | ५ महिला सदस्यांचा समावेश

Homeadministrative

PMC General Body Meeting | पुणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणावर ७ नगरसेवकांची नियुक्ती | ५ महिला सदस्यांचा समावेश

Ganesh Kumar Mule Jun 30, 2026 7:39 PM

BJP Vs Congress in PMC GB  | महिला आरक्षण विधेयकावरून भाजप-काँग्रेस मुख्य सभेत आमने-सामने
PMC Employees Promotion | स्नेहल हरपळे यांना उद्यान अधिक्षक पदावर पदोन्नती!
PMC General Body | विधी समितीने मान्य केलेले दोन प्रस्ताव मुख्य सभेने फेटाळले! 

PMC General Body Meeting | पुणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणावर ७ नगरसेवकांची नियुक्ती | ५ महिला सदस्यांचा समावेश

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन व अधिनियम १९७५ चे कलम ३(१) अन्वये पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष संरक्षण व संवर्धन प्राधिकरणाची (ट्री अॅथॉरिटी) पुनर्रचना करण्यात आली आहे. आज झालेल्या मुख्य सभेत ७ सभासदांची या प्राधिकरणावर नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे यात ५ महिला नगरसेविकांचा समावेश आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

मुख्य सभेच्या मंजुरीनंतर खालील नगरसेवकांची वृक्ष प्राधिकरणावर नियुक्ती करण्यात आली आहे :

१. रुपाली सचिन पवार
२. कोमल सारंग नवले
३. उज्ज्वला सुभाष जंगले
४. शैलजीत जयवंत बनसोडे
५. स्नेहा नामदेव कांबळे
६. अंजली विनोद ओरसे
७. विशाल हरि मलके

महाराष्ट्र झाडांचे जतन अधिनियम १९७५ नुसार महापालिका हद्दीतील झाडांची कत्तल, पुनर्रोपण, वृक्ष लागवड व संवर्धन यासाठी वृक्ष प्राधिकरणाची परवानगी आवश्यक असते. शहरातील विकासकामांसाठी झाडे तोडावी लागल्यास त्याचा मोबदला म्हणून वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट व देखभाल यावर हे प्राधिकरण निर्णय घेते.

शहरात सुरू असलेले मेट्रो, रस्ते रुंदीकरण, उड्डाणपूल यांसारख्या पायाभूत प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. या पार्श्वभूमीवर नवीन वृक्ष प्राधिकरणावर शहरातील हरित क्षेत्र वाचवण्याची आणि नव्याने वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्याची मोठी जबाबदारी असणार आहे.
—-

शेठ ताराचंद रुग्णालयाच्या नियामक मंडळावर ४ मनपा सदस्यांची नेमणूक

पुणे महानगरपालिकेच्या आज झालेल्या मुख्य सभेत शेठ ताराचंद रामनाथ धर्मार्थ आयुर्वेदिक रुग्णालयाच्या नियामक मंडळावर ४ मनपा सदस्यांची नेमणूक करण्यात आली.

मुख्य सभेच्या मंजुरीने खालील नगरसेवकांची नियामक मंडळावर नेमणूक करण्यात आली आहे :

१. गणेश मधुकर बिडकर (प्रभाग क्र. २४ ड) – सभागृह नेते
२. कल्पना दिलीप बहिरट (प्रभाग क्र. २४ अ)
३. उज्ज्वला गणेश यादव (प्रभाग क्र. २४ ब)
४. देवेंद्र प्रभाकर वडके (प्रभाग क्र. २४ क)

रुग्णालयाच्या दैनंदिन कारभारावर देखरेख, धोरणात्मक निर्णय, अर्थसंकल्पीय तरतुदी, नवीन उपचार सुविधा सुरू करणे, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे व रुग्णसेवेचा दर्जा उंचावणे या बाबींमध्ये नियामक मंडळाची भूमिका महत्त्वाची असते.

सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यासह अनुभवी नगरसेवकांच्या नियुक्तीमुळे रुग्णालयाच्या कामकाजाला गती मिळेल व नागरिकांना अधिक चांगल्या आयुर्वेदिक सेवा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: