PMC Primary Education Department | पुणे मनपा शिक्षक बदल्यांचे धोरण जिल्हा परिषद शिक्षकांच्या धर्तीवर!

Homeadministrative

PMC Primary Education Department | पुणे मनपा शिक्षक बदल्यांचे धोरण जिल्हा परिषद शिक्षकांच्या धर्तीवर!

Ganesh Kumar Mule May 06, 2026 7:19 AM

Property Tax Recovery | मुख्य लेखापरीक्षकांनी आक्षेप काढूनही टॅक्स विभाग 7 कोटींची वसुली करण्याबाबत उदासीन 
Sports Complex for Police Force | पोलीस दलासाठी पुणे येथे अत्याधुनिक क्रीडा संकुल
PMC Ward 20 – Bibvewadi Mahesh Society | प्रभाग क्रमांक – २० – बिबवेवाडी महेश  सोसायटी |  प्रभागाची रचना आणि व्याप्ती सविस्तर जाणून घ्या 

PMC Primary Education Department | पुणे मनपा शिक्षक बदल्यांचे धोरण जिल्हा परिषद शिक्षकांच्या धर्तीवर!

| महापालिका प्रशासनाने बदलीचे धोरण केले पुनर्निश्चीत

 

Teacher Transfer Policy – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग संचलित सर्व माध्यमांच्या एकूण ३२० शाळा आहेत. या शाळांमध्ये १५ क्षेत्रीय विभागांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या विनंती व प्रशासकीय बदल्या  वेळोवेळी करण्यात येतात. मात्र शिक्षण मंडळ हे बरखास्त होऊन  प्राथमिक शिक्षण विभाग हा सद्यस्थितीत पुणे महानगरपालिकेच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांसाठी बदलीचे धोरण हे पुनर्निश्चीत करणे आवश्यक होते. त्यानुसार आता राज्य सरकारच्या धोरणाशी सुसंगत म्हणजे जिल्हा परिषद शिक्षकांच्या धर्तीवर पुणे मनपा शिक्षकांच्या बदलीचे धोरण तयार करण्यात आले आहे. तसेच हे धोरण माहितीसाठी शिक्षण समिती समोर ठेवण्यात आले आहे. (Pune PMC News)

प्राथमिक शिक्षकांच्या बदली धोरण नुसार दोन पद्धतीने बदल्या करण्यात येतात. प्रशासकीय बदली आणि विनंती बदली. प्रशासकीय बदली चा कालावधी हा  एकाच शालेय प्रांगणामध्ये असलेल्या इमारतीमध्ये मिळून सलग १० वर्ष सेवा असा असणार आहे. तर विनंती बदली चा कालावधी हा एकाच शाळेत सलग ५ वर्ष सेवा असा असणार आहे.

अ) विनंती बदल्यांसाठी  प्राधान्यक्रम असा असेल

१) पक्षाघाताने आजारी शिक्षक (Paralysis) २) दिव्यांग शिक्षक (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिमधील नमूद प्रारूपाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक) मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक (पालक म्हणजे आई-वडील किंवा ते नसल्यास बहीण-भाऊ) तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक ३) हृदय शत्रक्रिया झालेले शिक्षक ४) जन्मापासून एकच मुत्रपिंड (किडनी) असलेले / मुत्रपिंड रोपण केलेले शिक्षक / डायलेसिस शिक्षक ५) यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक ६) कॅन्सर (कर्करोग) आजारी शिक्षक ७) मेंदूचा आजार झालेले शिक्षक ८) थॅलेसेमिया / कॅन्सर विकारग्रस्त मुलांचे पालक / जन्मजात गुणसूत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे आजार व इतर आजार (पालक म्हणजे आई-वडील किंवा ते नसल्यास बहीण-भाऊ), तसेच ज्या शिक्षकांचे आई किंवा वडील कॅन्सरग्रस्त आहेत व त्यांचेवर उपचार सुरु आहेत असे शिक्षक ९) माजी सैनिक तसेच आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी / विधवा १०) विधवा शिक्षिका ११) कुमारीका शिक्षिका १२) परित्यक्ता/ घटस्फोटीत महिला शिक्षक १३) वयाची ५३ वर्षे पूर्ण केलेले शिक्षक १४) स्वातंत्र्य सैनिकांचा मुलगा / मुलगी / नातू / नात (स्वातंत्र्य सैनिक ह्यात असेपर्यंत)

या आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधीग्रस्त आहेत असे शिक्षक :

१५) हृदय शत्रक्रिया झालेले १६) जन्मापासून एकच मुत्रपिंड (किडनी) असलेले / मुत्रपिंड रोपण केलेले शिक्षक / डायलेसिस शिक्षक १७) यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक १८) कॅन्सर (कर्करोग) आजारी शिक्षक १९) मेंदूचा आजार झालेले शिक्षक २०) थॅलेसेमिया विकारग्रस्त असलेले

ब) प्रशासकीय बदल्यांसाठी या कर्मचाऱ्यांना सवलत दिली जाईल किंवा वगळण्यात येईल-:

१ ते २० मधील पात्र शिक्षकांनी सक्षम प्राधिकारी यांचेकडील पुरावा पत्र सादर केल्यास त्यांना प्रशासकीय बदलीतून सूट देण्यात येईल. तथापि त्यांना १ वर्ष सेवाकालावधी नंतर विनंती बदलीची मागणी करता येईल.  प्रशासकीय बदली या प्रकारात वरील तक्त्यात नमूद केलेला कालावधी पूर्ण झालेला नसेल परंतु विद्यार्थी हित विचारात घेऊन प्रशासकीय सोयीसाठी बदली करण्यात येईल.  जे प्राथमिक शिक्षक दिव्यांग आहेत किंवा त्यांची पाल्य ही मतिमंद आहेत तसा दाखला जिल्हा शल्यचिकीत्सक तथा सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्रानुसार संबंधित शिक्षकांनी ३० एप्रिल पूर्वी सादर केल्यास त्याला प्रशासकीय बदलीतून वगळण्यात येईल. मात्र अशी प्रमाणपत्रे बनावट/बेकायदेशीर आढळून आल्यास अशा संबंधित शिक्षकांविरुद्ध  कार्यवाही करण्यात येईल, याची जाणीव सबंधित मुख्याध्यापकांनी सबंधित प्राथमिक शिक्षकांना त्यांचे स्तरावरून द्यावी.
जे प्राथमिक शिक्षक विशेष करून विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या महिला कर्मचारी, कर्करोगानेग्रस्त, पक्षाघाताने आजारी व डायलेसीस सुरु असलेल्या प्राथमिक शिक्षकांना सदर प्रशासकीय बदल्यांमधून वगळण्यात येईल. मात्र तदनुषंगिक पुरावा त्यांनी प्रत्येक वर्षी ३० एप्रिल पूर्वी सबंधित मुख्याध्यापक यांचे मार्फत उप आयुक्त, प्राथमिक शिक्षण विभाग यांचे कडे सादर करणे बंधनकारक राहील. एकाच इमारतीत जास्तीत जास्त सेवाजेष्ठ असलेल्या शिक्षकाला बदलीसाठी सेवाजेष्ठ धरण्यात येईल.

शिक्षक अतिरिक्त ठरल्यास जादाकडून कमीकडे समायोजन करताना सेवाजेष्ठतेनुसार समुपदेशन प्रक्रिया राबविली जाईल. समुपदेशन प्रक्रिया राबवत असताना संचमान्यतेनुसार मंजूर पदे व कार्यरत पदे यांचा विचार करून रिक्त पदे सम प्रमाणात दाखविण्यात येतील.  समुपदेशन पद्धतीने बदली प्रक्रिया राबवून त्याच दिवशी खातेप्रमुखांच्या स्वाक्षरीने आदेश निर्गत करण्यात येतील.  शिक्षकांना सेवाजेष्ठतेनुसार शाळा निवडीची संधी देण्यात येईल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: