Pune Stray Dogs | पुण्यात श्वानदंशाच्या घटनांत वाढ; 2025 सालात 30 हजारांहून अधिक नागरिकांना लस  

Homeadministrative

Pune Stray Dogs | पुण्यात श्वानदंशाच्या घटनांत वाढ; 2025 सालात 30 हजारांहून अधिक नागरिकांना लस  

Ganesh Kumar Mule May 21, 2026 11:22 AM

PMC Properties Database |  महापालिकेच्या सर्व  मालमत्तांचे सर्वेक्षण करून एकत्रित डेटाबेस तयार केला जाणार
PMC Employees Union | पीएमसी एम्प्लॉईज युनियन कडून महापालिकेत दिवाळी फराळ वाटप! | दिव्यांग विद्यार्थी व मनपा तृतीयपंथी सेवकांना वितरण
Pune Metro | पुण्यात मेट्रोचे २०० किमीचे जाळे उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | पुणे मेट्रो भवनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

Pune Stray Dogs | पुण्यात श्वानदंशाच्या घटनांत वाढ; 2025 सालात 30 हजारांहून अधिक नागरिकांना लस

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) –  पुणे महानगरपालिका क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत श्वानदंशाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून 2025 मध्ये तब्बल 30,613 नागरिकांना लस घ्यावी लागल्याची माहिती समोर आली आहे. नगरसेवक सुनिल नामदेव पांडे यांनी विचारलेल्या प्रश्नाला आरोग्य विभागाने दिलेल्या उत्तरातून ही आकडेवारी उघड झाली.

वर्षनिहाय लस घेतलेल्या नागरिकांची संख्या:

2022: 16,561

2023: 22,945

2024: 25,899

2025: 30,613

2026 (आतापर्यंत): 6,503

कुत्रा चावणे, नख लागणे, नख खरचटणे या सर्व घटनांची नोंद नायडू हॉस्पिटलमध्ये ‘श्वान दंश’ म्हणून केली जाते. 2022 च्या तुलनेत 2025 मध्ये श्वानदंशाच्या घटनांमध्ये जवळपास दुप्पट वाढ झाली आहे.

भटक्या कुत्र्यांची संख्या तीन लाखांवर?

पुणे मनपा हद्दीतील भटक्या कुत्र्यांची संख्या अंदाजे तीन लाखांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. पूर्वी QI CODE या खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार ही संख्या 1,79,000 इतकी होती. मात्र 32 गावांचा मनपात समावेश झाल्याने ही संख्या वाढल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

‘ABC’ कार्यक्रमाची सद्यस्थिती

भटक्या कुत्र्यांची नसबंदी व लसीकरणासाठी मनपाने तीन संस्थांसोबत करार केला होता. त्यातील सद्यस्थिती:  Canine Control & Care, बाणेर व नायडू: या संस्थेने कामकाज बंद केले आहे.  युनिव्हर्सल अनिमल वेल्फेअर सोसायटी: मुंढवा स.नं. 9 ते 14/2 येथे नसबंदी व लसीकरणाचे काम सुरू आहे.  युनिव्हर्सल अनिमल वेल्फेअर सोसायटी: स्वतःच्या जागेवर होळकर वाडी, वडकी, कात्रज येथेही काम करत आहे.

एक संस्था बंद पडल्याने नसबंदी मोहिमेवर परिणाम झाला आहे. श्वानदंशाच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, ABC कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्याची मागणी होत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: