Pune Ganeshotsav 2026 | गणेशोत्सव 2026 साठी PMC कडून 308 मूर्ती विक्री स्टॉल जाहीर

Homeadministrative

Pune Ganeshotsav 2026 | गणेशोत्सव 2026 साठी PMC कडून 308 मूर्ती विक्री स्टॉल जाहीर

Ganesh Kumar Mule Aug 31, 2026 11:39 AM

Sinhgad Road Flyover | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सिहंगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण
Joint Municipal Commissioner PMC | आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने आता सह महापालिका आयुक्त!
Pune Rain | पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली | पाणीपुरवठा करणारी धरणे ९७% भरली 

Pune Ganeshotsav 2026 | गणेशोत्सव 2026 साठी PMC कडून 308 मूर्ती विक्री स्टॉल जाहीर!

|  05 सप्टेंबरपासून 10 दिवस परवानगी

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – सालाबादप्रमाणे पुणे शहरात साजरा होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाने श्री गणेश मूर्ती विक्रीसाठी तात्पुरत्या स्वरूपात परवानगी देण्याबाबत जाहीर आवाहन प्रसिद्ध केले आहे. (PMC Land Acquistion and Management Department)

महापालिका आयुक्तांच्या मान्यतेने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या आवाहनानुसार सन *2026* या वर्षासाठी पुणे मनपा हद्दीत क्षेत्रीय कार्यालय निहाय *15 फूट x 10 फूट* मापाचे एकूण *308* गणपती मूर्ती विक्री गाळे निश्चित करण्यात आले आहेत. याची यादी पुणे मनपाच्या संकेतस्थळावर EOI व जाहीर आवाहन या शिर्षाखाली प्रसिद्ध केली आहे.

स्टॉल उभारणीचा कालावधी:

श्री गणेश मूर्ती स्टॉल उभारणीची मुदत  05/09/2026 पासून ते दि. 14/09/2026 अशी 10 दिवस राहील.

*रस्ता-पदपथावर बंदी, फक्त मनपाच्या मोकळ्या जागेवर:*
सद्यस्थितीत श्री गणेश मूर्तीचे गाळे उभारण्यास रस्ता व पदपथावर परवानगी देण्यात येणार नसून, पुणे महानगरपालिकेच्या मालकीच्या मोकळ्या बांधीव जागांवर, मैदान, पटांगण इ. जागांवरच परवानगी देण्यात येणार आहे.

23 ठिकाणी 308 जागा निश्चित:

मनपा मालमत्ता विभागाने 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत 23 ठिकाणी जागा निश्चित केल्या आहेत.

– औंध-बाणेर (बालेवाडी स.नं. 17) – 10
– कोंढवा-येवलेवाडी (कोंढवा खुर्द) – 05
– हडपसर-मुंढवा (हायस्कूल आरक्षित जागा + मोहन धारिया उद्यान) – 40
– येरवडा-कळस-धानोरी (धानोरी अॅमेनिटी स्पेस + जुना जकात नाका) – 30
– कोथरुड-बावधन (ओटा मार्केट + स्वामी विवेकानंद शाळा + सावरकर मैदान) – 40
– धनकवडी-सहकारनगर (सह्याद्री मैदान + कात्रज प्रायमरी स्कूल) – 30
– बिबवेवाडी (लोवर इंदिरा नगर) – 15
– सिंहगड रोड (धायरी + वडगाव बु. ओटा मार्केट) – 23
– नगर रोड-वडगाव शेरी (लोहगाव + खराडी) – 40
– वारजे-कर्वेनगर (एरंडवणा + वारजे) – 25
– घोले रोड (शिवाजी व्यायाम मंडळ + तुकाराम ओंबाळे मैदान + नेहरू सांस्कृतिक भवन) – 25

कार्यपद्धती आणि अर्ज:

1. पुणे मनपा मालमत्ता विभागामार्फत भाडे कराराने जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पोलीस परवानगी व इतर कायदेशीर परवानग्या घेण्याची जबाबदारी स्टॉल धारकाची राहील.
2. नमुना ‘अ’ नुसार अर्ज ऑफलाईन सादर करावा.
3. अर्जासोबत पॅन कार्ड, आधार कार्ड, संपर्क क्रमांक, बँक पासबुकची झेरॉक्स जोडावी.
4. *अनामत रक्कम रू. 10,000/-* पुणे मनपाच्या अकाऊंटवर ऑनलाईन/डेबिट/क्रेडिट कार्ड द्वारे किंवा ऑफलाईन क्षेत्रीय कार्यालयात जमा करावी.
5. अर्जाची छाननी नंतर पात्र गाळेधारकांना 10 दिवसांचे विहित भाडे जमा करावे लागेल.
6. फक्त मोकळी जागा दिली जाईल, स्टॉलचे तात्पुरत्या स्वरूपाचे बांधकाम स्वतः खर्चाने करावे लागेल.
7. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, साथ प्रतिबंधक अधिनियम 1897, महाराष्ट्र शासन व हरित लवादाच्या आदेशांचे पालन बंधनकारक.
8. अग्निशमन विभागाकडील अटी-शर्तींची पूर्तता, बांबूचे रेलिंग, बॅरिकेटिंग, नागरिकांसाठी सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक.
9. परिसराची स्वच्छता राखण्याची जबाबदारी गाळेधारकांची, अस्वच्छता आढळल्यास दंडात्मक कारवाई व अनामत रकमेतून दंड वसूल केला जाईल.
10. मुदत संपल्यानंतर 3 दिवसांच्या आत स्वतः खर्चाने बांधकाम हटवून जागा स्वच्छ व रिकामी करून द्यावी लागेल.

या प्रकरणी आदेशाचे पालन न केल्यास 24 तासाची पूर्वसूचना देऊन परवानगी रद्द करण्याचा अधिकार महापालिकेस राहील, असे उप आयुक्त (मालमत्ता व्यवस्थापन) प्रशांत ठोंबरे यांनी कळवले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: