Pune Smart City | स्मार्ट सिटी कंपनी बंद; १४ कर्मचाऱ्यांना महापालिकेत सामावून घेण्याचा प्रस्तावाला मान्यता

Homeadministrative

Pune Smart City | स्मार्ट सिटी कंपनी बंद; १४ कर्मचाऱ्यांना महापालिकेत सामावून घेण्याचा प्रस्तावाला मान्यता

Ganesh Kumar Mule May 14, 2026 9:03 PM

Balewadi Garbage Collection Center | बालेवाडी परिसरातील कचरा संकलन केंद्राच्या जागेचा मार्ग मोकळा
PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने जानेवारी महिन्यात वसूल केला ६० लाखाचा दंड!
PMC IT Department | समाविष्ट गावातील संगणक प्रणाली होणार अपडेट! | प्रशासकीय कामकाजात येणार गतिमानता!

Pune Smart City | स्मार्ट सिटी कंपनी बंद; १४ कर्मचाऱ्यांना महापालिकेत सामावून घेण्याचा प्रस्तावाला मान्यता

| स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) –  केंद्राच्या ‘स्मार्ट सिटी मिशन’ अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) या कंपनीला शासनाने बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित १४ अनुभवी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी न करता पुणे महापालिकेत एकवट मानधनावर सामावून घेण्याबाबत स्थायी समितीपुढे प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. (Shrinath Bhimale PMC)

सन २०१६ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीत राज्य शासन आणि पुणे महानगरपालिका यांची प्रत्येकी ५० टक्के भागीदारी आहे. कंपनीत कंपनी सचिव, अभियंते, लेखा व वित्त अधिकारी, लिपिकवर्ग आदी मिळून एकूण १४ कर्मचारी कार्यरत असून, औंध, बाणेर आणि बालेवाडी परिसरातील विविध विकासकामांचा त्यांना जवळपास नऊ वर्षांचा अनुभव आहे. मात्र, शासनाच्या २२ एप्रिल २०२६ च्या निर्णयानुसार ही कंपनी बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा विचार करून त्यांना महापालिकेत सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: