Pune Rain | PMC Deputy Commissioner | शासनाकडील अनुभवी उपयुक्तांना दिली जावी महापूरात सापडलेल्या विस्थापितांची जबाबदारी!  | विविध क्षेत्रातून मागणी

HomeपुणेBreaking News

Pune Rain | PMC Deputy Commissioner | शासनाकडील अनुभवी उपयुक्तांना दिली जावी महापूरात सापडलेल्या विस्थापितांची जबाबदारी! | विविध क्षेत्रातून मागणी

गणेश मुळे Jul 26, 2024 1:27 PM

PMC Deputy Commissioner Transfer | पुणे महापालिकेतील तीन उपायुक्तांच्या बदल्या! | राज्य सरकारकडून आदेश जारी
Pune Municipal Corporation | No drainage cleaning in your area? Then call these officials of Pune Municipal Corporation
PMC Deputy Commissioner | उपायुक्त यांच्या कामकाज व्यवस्थेत महापालिका आयुक्तांकडून पुन्हा बदल | काही अधिकाऱ्यांवर विश्वास तर काहींचे विभाग काढून  घेतले 

Pune Rain | PMC Deputy Commissioner | शासनाकडील अनुभवी उपयुक्तांना दिली जावी महापूरात सापडलेल्या विस्थापितांची जबाबदारी!  | विविध क्षेत्रातून मागणी

Pune Municipal Corporation (PMC) – (The Karbhari News Service) – पुणे शहर आणि परिसरात गेले काही दिवस पडत असलेल्या पावसाने कहर केला आहे. कित्येक लोकांना आपले घर सोडून राहावे लागत आहे. महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत मात्र कर्मचाऱ्यांच्या अभावी पालिकेवर ताण येत आहे. दरम्यान पालिकेत नुकतेच सरकारकडील ४ अधिकारी उपायुक्त म्हणून रुजू झाले आहेत. त्यातील काही अधिकाऱ्यांनी याआधी पालिकेत विविध झोनला काम पाहिले आहे. पूरग्रस्त आणि विस्थापित लोकांची जबाबदारी या अनुभवी उपायुक्त यांना दिली तर चांगला समन्वय साधला जाईल. अशी मागणी विविध क्षेत्रातून महापालिका आयुक्त यांच्याकडे केली जात आहे. (Pune News)
पुणे महापालिका क्षेत्रात पडलेला पाऊस आणि धरणातून केलेला विसर्ग यामुळे पुणे शहरात महापुराची स्थिती निर्माण झाली. लोकांच्या घरात पाणी शिरल्याने लोकांना विस्थापित व्हावे लागले. तसेच त्यांचे आर्थिक नुकसान देखील झाले. शिवाय त्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ लागला आहे. महापालिकेकडून आता पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र हे काम करण्यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. (Pune PMC News)
दरम्यान पालिकेत नुकतेच सरकारकडील ४ अधिकारी उपायुक्त म्हणून रुजू झाले आहेत. त्यातील काही अधिकाऱ्यांनी याआधी पालिकेत विविध झोनला काम पाहिले आहे. पूरग्रस्त आणि विस्थापित लोकांची जबाबदारी या अनुभवी उपायुक्त यांना दिली तर चांगला समन्वय साधला जाईल. यासाठी शहरांचे दोन भाग पाडून  दोन उपायुक्त अधिकऱ्यांची नेमणुक करावी.
कारण नुकसान भरपाई आणि पंचनामा यासारखे विषय महसूल विभागातील अधिकारी चांगल्या पद्धतीने हाताळू शकतात. त्याचे चांगले ज्ञान देखील त्यांना असते. असे झाले तर शहरात चांगले काम होईल. नागरिकांना मदत मिळण्यात कसूर होणार नाही. नागरिकांचा पालिकेवरील विश्वास वाढेल. त्यामुळे महापालिकेची प्रतिष्ठा देखील सरकारी अधिकाऱ्यांमुळे वाढीस लागेल. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.