PMC Deputy Commissioner | उपायुक्त काटकर आयुक्तांचे OSD, सामान्य प्रशासन विभाग थोरात यांच्याकडे, किशोरी शिंदे यांच्याकडील भांडार विभाग काढून घेतला तर माधव जगताप यांच्याकडे आकाशचिन्ह विभागाची पुन्हा जबाबदारी!

Homeadministrative

PMC Deputy Commissioner | उपायुक्त काटकर आयुक्तांचे OSD, सामान्य प्रशासन विभाग थोरात यांच्याकडे, किशोरी शिंदे यांच्याकडील भांडार विभाग काढून घेतला तर माधव जगताप यांच्याकडे आकाशचिन्ह विभागाची पुन्हा जबाबदारी!

Ganesh Kumar Mule Sep 20, 2025 6:29 PM

PMC Water Meter | अवास्तव पाणीवापर लपवण्यासाठी आयुक्त बंगला, महापौर बंगल्यावरच  पाणी मीटर्स बसवले नाहीत
National Sports Day | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा
Katraj Dairy Pune | Play Ground Reservation | कात्रज येथील मैदानाचे आरक्षण उठवू नये या मागणीसाठी महाविकास आघाडीचे वतीने पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन

PMC Deputy Commissioner | उपायुक्त काटकर आयुक्तांचे OSD, सामान्य प्रशासन विभाग थोरात यांच्याकडे, किशोरी शिंदे यांच्याकडील भांडार विभाग काढून घेतला तर माधव जगताप यांच्याकडे आकाशचिन्ह विभागाची पुन्हा जबाबदारी!

| उपायुक्त यांच्या कामकाज व्यवस्थेत बदल

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत नुकतेच दोन उपयुक्त आणि एक सहायक आयुक्त यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्यांना कुठल्या विभागाची जबाबदारी दिली नव्हती. नवीन उपायुक्त सहित आता काही अधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाने याबाबत आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

उपायुक्त प्रसाद काटकर हे आता महापालिका आयुक्त यांचे OSD अर्थात विशेष कार्यकारी अधिकारी असतील. त्यांच्याकडील सामान्य प्रशासन विभाग काढून घेत तो उपायुक्त विजयकुमार थोरात यांच्याकडे देण्यात आला आहे. उपायुक्त माधव जगताप यांच्याकडे नुकतीच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे काम देण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांना आकाशचिन्ह आणि परवाना विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर उपायुक्त संतोष वारुळे यांच्याकडील आकाशचिन्ह विभाग, पर्यावरण विभाग काढून घेतला आहे. तसेच उपायुक्त किशोरी शिंदे यांच्याकडील मध्यवर्ती भांडार काढून घेण्यात आला आहे. माळी यांच्याकडील समाज विकास विभाग उपायुक्त जयंत भोसेकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. उपायुक्त सुनील बल्लाळ यांच्याकडील सांस्कृतिक केंद्र विभाग किशोरी शिंदे यांच्याकडे देण्यात आला आहे.

उपायुक्त संदीप कदम यांच्याकडील घनकचरा विभाग आणि अविनाश सकपाळ यांच्याकडील कर आकारणी विभाग तसेच ठेवण्यात आले आहेत. दरम्यान राहुल जगताप यांना माहिती तंत्रज्ञान विभागाचे विभाग प्रमुख करण्यात आले आहे. तर मुख्य सुरक्षा अधिकारी रमेश शेलार यांना देखील आता कार्यकारी करण्यात आले आहे.

असे असेल अधिकाऱ्यांचे कामकाज

प्रसाद काटकर – १) परिमंडळ क्र. ३ विभाग २) निवडणूक विभाग (३) मा. महापालिका आयुक्त यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (OSD)

२) सोमनाथ बनकर – १) झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग २) पुणे मनपा वसाहती व्यवस्थापन (चाळ विभाग)

३) प्रशांत ठोंबरे – १) मालमत्ता व व्यवस्थापन विभाग २) दक्षता विभाग

४) विजय लांडगे – १) स्थानिक संस्था कर विभाग २) जनगणना विभाग ३) जनरल रेकॉर्ड

५)  किशोरी शिंदे – १) सांस्कृतिक केंद्र विभाग २) क्रिडा विभाग ३) उप आयुक्त (विशेष) विभाग ४) मुद्रणालय विभाग

६) अविनाश सकपाळ – १) कर आकारणी व कर संकलन विभाग २) महात्मा फुले वाडा आरक्षित क्षेत्राचे संपादनचे कामकाज

७) माधव जगताप – १) परिमंडळ क्र. १ विभाग २) आकाशचिन्ह व परवाना विभाग ३) आपत्ती व्यवस्थापन विभाग ४) मंडई विभाग

८)  जयंत भोसेकर – १) समाज कल्याण विभाग २) समाज विकास विभाग ३) मागासवर्ग विभाग ४) तक्रार निवारण अधिकारी (दिव्यांग)

९) सुनील बल्लाळ – परिमंडळ क्र. ५ विभाग

१०)  संदीप खलाटे – १) अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग (२) सुरक्षा विभाग सनियंत्रण

११)  संदीप कदम – घनकचरा व्यवस्थापन विभाग

१२)  वसुंधरा बारवे – १) प्राथमिक शिक्षण विभाग २) माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभाग संनियंत्रण (३) प्रशिक्षण प्रबोधिनी

१३) श्री. विजयकुमार थोरात –  १) सामान्य प्रशासन विभाग २) तांत्रिक विभाग ३) बीओटी सेल

१४)  संतोष वारुळे – १) परिमंडळ क्र. २ विभाग २) माहिती व जनसंपर्क विभाग ३) सोशल मिडिया कक्ष

१५) अरविंद माळी – १) परिमंडळ क्र. ४ विभाग २) मध्यवर्ती भांडार विभाग

१६)  रवि पवार १) मोटार वाहन विभाग २) पर्यावरण विभाग

१७)  निखील मोरे – भूसंपादन व व्यवस्थापन विभाग

१८)  राहुल जगताप, ई- प्रशासक ( प्रभारी पदभार ) – माहिती तंत्रज्ञान विभाग

१९) श्री. रमेश शेलार (मुख्य सुरक्षा अधिकारी) – सहाय्यक अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग प्रमुख,  संदीप खलाटे, उप आयुक्त यांच्या अधिनिस्त कामकाज करणे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: