National Book Trust | भाजी मंडईची जागा 29 वर्षांसाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाला भाड्याने देण्याबाबत शिवसेना ठाकरे गटाचा आरोप

HomeBreaking News

National Book Trust | भाजी मंडईची जागा 29 वर्षांसाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाला भाड्याने देण्याबाबत शिवसेना ठाकरे गटाचा आरोप

Ganesh Kumar Mule Aug 12, 2026 10:08 PM

Baner-Balewadi 24×7 Water Supply Scheme | नागपूरच्या धर्तीवर २४x७ समान पाणीपुरवठा योजनेला बाणेर-बालेवाडी भागात प्रथमच सुरूवात
Breaking : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द
7th Pay Commission 5th Installment  | पुणे महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | 7 व्या वेतन आयोगाच्या पाचव्या हफ्त्याची रक्कम देण्याबाबत सर्क्युलर जारी!

National Book Trust | भाजी मंडईची जागा 29 वर्षांसाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाला भाड्याने देण्याबाबत शिवसेना ठाकरे गटाचा आरोप

– “महापालिकेचे नियम धाब्यावर, चौकशी करा” – गजानन थरकुडे

 

Gajanan Tharkude Pune UBT – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या बाणेर-बालेवाडीतील मोक्याच्या ठिकाणावरील भाजी मंडईसाठी राखीव असलेली जागा राष्ट्रीय पुस्तक न्यासाला (National Book Trust) 29 वर्षांसाठी नियमबाह्य पद्धतीने भाड्याने दिली असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केला आहे. (Pune PMC News)

शहरप्रमुख गजानन थरकुडे यांनी मालमत्ता विभागाच्या उपआयुक्तांना पत्र पाठवून याची चौकशी करण्याची आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

थरकुडे यांनी पत्रात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक 9 मधील बाणेर-बालेवाडी येथे भाजी मंडईसाठी आरक्षित असलेली जागा महापालिकेने राष्ट्रीय पुस्तक न्यासाला 29 वर्षांसाठी दिली आहे.

शिवसेनेचा मुख्य आक्षेप हा आहे की, महापालिकेच्या नवीन नियमानुसार 3 वर्षांपेक्षा अधिक काळ कोणतीही जागा कुठलीही भाड्याने देता येत नाही.
मात्र सदर जागा देताना “कुठल्या नियमावलीत दिली गेली” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

थरकुडे यांनी पत्रात प्रशासनाला 4 मुद्द्यांवर लेखी माहिती मागितली आहे:

1. *मूल्यांकन*: ही जागा संस्थेला देताना तिचे बाजारभावानुसार मूल्यांकन करण्यात आले होते का?
2. *नियम आणि टेंडर*: ही जागा नेमक्या कुठल्या नियमांतर्गत देण्यात आली? त्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली होती का?
3. *मान्यता*: हा विषय स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता का?
4. *चौकशी आणि कारवाई*: नियमबाह्य पद्धतीने जागा दिली असेल तर या प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची तातडीने चौकशी करून कारवाई करावी.

“ही जागा मोक्याच्या ठिकाणी असून ती भाजी मंडईसाठी राखीव आहे. ती नियम धाब्यावर टाकून देण्यात आल्यास सामान्य नागरिकांचे नुकसान होईल” असे थरकुडे यांनी पत्रात नमूद केले आहे.

या प्रकरणामुळे आता महापालिका प्रशासनावर जागा वाटपात पारदर्शकता नसल्याचा आरोप होत आहे. मालमत्ता विभाग यावर काय खुलासा करतो याकडे लक्ष लागले आहे.

—

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: