Laxmi Road Pay and Park | लक्ष्मी रोडवर “पे अँड पार्क” सुरू होणार! | पार्किंगसाठी पैसे मोजावे लागणार

Homeadministrative

Laxmi Road Pay and Park | लक्ष्मी रोडवर “पे अँड पार्क” सुरू होणार! | पार्किंगसाठी पैसे मोजावे लागणार

Ganesh Kumar Mule Aug 12, 2026 8:56 PM

PMC Ward Structure Objections and Suggestions | प्रारूप प्रभाग रचनेवर आतापर्यंत २५३७ हरकती आणि सूचना | हरकत घेण्यासाठी उद्या शेवटचा दिवस
Bhavani Peth Palkhi | भवानी पेठ पालखी मुक्काम स्थळाच्या सोयी-सुविधांची पाहणी संपन्न; प्रशासकीय सज्जतेवर भर
 Pune PMC Commissioner | माहिती अधिकार दिनात पूरस्थिती बाबतचा समिती अहवाल दाखवला पण प्रत द्यायला मात्र महापालिका आयुक्तांचा नकार | विवेक वेलणकर

Laxmi Road Pay and Park | लक्ष्मी रोडवर “पे अँड पार्क” सुरू होणार! | पार्किंगसाठी पैसे मोजावे लागणार

PBP GROUP ला 3 वर्षांसाठी कंत्राट

 

Pune Pay And Park – (The Karbhari News Service) – पुण्यातील सर्वात वर्दळीच्या लक्ष्मी रोडवर आता रस्त्यावरच “To Run on Street Pay & Park” योजना सुरू होणार आहे. यासाठी PBP GROUP या कंपनीची निवड करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त कार्यालयाने यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी पाठवला आहे. (PMC Standing Committee)

8 वर्षांपासून रखडलेली योजना
राज्य शासनाने मे 2018 मध्ये रस्त्यावरील गाडी पे अँड पार्क धोरण जाहीर केले होते. त्यानुसार पुणे महापालिका शहरातील विविध रस्त्यांवर ही योजना राबवण्यासाठी प्रयत्नशील होती.
लक्ष्मी रोडसाठी यापूर्वी 3 वेळा निविदा काढण्यात आल्या, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अटी-शर्तींमध्ये बदल करून चौथ्यांदा निविदा प्रक्रिया राबवण्यात आली.

कोणाला मिळाले कंत्राट?
या कामासाठी एकूण 5 निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यापैकी 4 निविदा प्राप्त झाल्या.
निविदा छाननीनंतर 2 कंपन्या पात्र ठरल्या:

1 Sri Sai Balaji Construction – अंदाजपत्रकापेक्षा 69%  ने कमी
2 P B P GROUP – अंदाजपत्रकापेक्षा 39.39% ने कमी

महापालिकेच्या निविदा समितीने आर्थिक हित लक्षात घेऊन सर्वात कमी म्हणजेच 39.39% ने कमी दर देणाऱ्या *P B P GROUP* ची निवड केली आहे.
या कंपनीने वर्षाला 1,77,35,640.01 रुपये देण्याची बोली लावली आहे.

काय असणार नियम?
1. *कालावधी*: कंत्राट 3 वर्षांसाठी असेल.
2. *उत्पन्न*: दरवर्षी मक्ता रकमेवर 2% वाढीव उत्पन्न महापालिकेला मिळणार आहे.
3. *पायलट प्रोजेक्ट*: रस्त्यावरील पे अँड पार्कचे काम महापालिका प्रथमच करत असल्याने हा पायलट प्रोजेक्ट ठरणार आहे.

नागरिकांना काय फायदा-तोटा?
लक्ष्मी रोड, जंगली महाराज रोडसह शहरातील 5 प्रमुख रस्त्यांवर पे अँड पार्क योजना राबवण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. त्यामुळे बेशिस्त पार्किंगला आळा बसेल आणि वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.
मात्र यापुढे लक्ष्मी रोडवर गाडी पार्क करण्यासाठी नागरिकांना ठराविक शुल्क मोजावे लागणार आहे.

आता अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव स्थायी समितीच्या माध्यमातून मुख्य सभेपुढे जाणार आहे.

—

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: