PMC Divyang Melava | पुणे महापालिकेच्या वतीने उद्या दिव्यांग मेळाव्याचे आयोजन!
PMC Social Development Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने जागतिक दिव्यांग दिनांनिमित्त (World Divyang Day) दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला आहे. बालगंधर्व रंगमंदिर (Balgandharva Rangmandir) येथे उद्या (शुक्रवारी) हा मेळावा होणार आहे. अशी माहिती महापालिका समाज विकास विभागाच्या (PMC SDD) वतीने देण्यात आली. (Pune PMC News)
पुणे महापालिकेच्या वतीने २०११ सालापासून दिव्यांग कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्यासाठी महापालिकेकडून दरवर्षी २० कोटीहून अधिक रक्कम खर्च केली जाते. दरम्यान महापालिका आता दिव्यांग मेळावा देखील आयोजित करत आहे.
उद्या होणाऱ्या कार्यक्रमामध्ये पुणे शहरात कार्यरत असलेल्या सिफार, समर्थनम ट्रस्ट, रेड्डीज फाऊंडेशन, युथ फॉर जॉब या सामाजिक संस्थांच्या मदतीने दिव्यांगसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याचबरोबर एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय आणि डी वाय पाटील दंत रुग्णालय यांच्या सहकार्याने नेत्र आणि दंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
दिव्यांगासाठी माहितीपर अशा संस्थांचे माहितीचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत.
दिव्यांगासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, याना तसेच दिव्यांगासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धांमधून विशेष प्राविण्य मिळवलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
एनेब्लर ट्रूस्ट च्या माध्यमातून दिव्यांग कला पथकाचे सुरेल गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
COMMENTS