Pune Property tax Discount | सवलतीसाठी मिळकत कर विभागाकडे नव्याने अर्ज करण्याची गरज नाही |  माजी नगरसेवकांची माधव जगताप यांच्या परिपत्रकाबाबत भूमिका

Homeadministrative

Pune Property tax Discount | सवलतीसाठी मिळकत कर विभागाकडे नव्याने अर्ज करण्याची गरज नाही |  माजी नगरसेवकांची माधव जगताप यांच्या परिपत्रकाबाबत भूमिका

Ganesh Kumar Mule Jan 02, 2025 10:35 PM

PMC Property Tax | मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी महापालिकेकडून आजपासून बँड चा वापर सुरु | पहिल्याच दिवशी 1 कोटी 58 लाख वसुली 
PMC Encroachment Department | आपली बेवारस वाहने रस्त्यावरून हटवा | आजपासून केली जाणार जप्तीची कारवाई
PMC Hawker’s Policy | 9852 पथारी व्यावसायीकांनी महापालिकेचे 56 कोटी भाडे थकविले

Pune Property tax Discount | सवलतीसाठी मिळकत कर विभागाकडे नव्याने अर्ज करण्याची गरज नाही |  माजी नगरसेवकांची माधव जगताप यांच्या परिपत्रकाबाबत भूमिका

 

PMC Property Tax Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation – PMC)सौर ऊर्जा, गांडूळ खत प्रकल्प तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग इत्यादी योजनांसाठी असणारी कर सवलत (Property Tax Discount) चालू ठेवण्यासाठी पुन्हा नव्याने अर्ज करण्याची गरज नाही, अशी भूमिका माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी  मांडली. उपायुक्त तथा कर आकारणी कर संकलन प्रमुख माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांनी काढलेल्या परिपत्रकाबाबत या माजी नगरसेवकांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. (Pune PMC News)

पुणे महानगरपालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाकडे सवलतीसाठी अर्ज नव्याने करण्याची गरज नाही. यामध्ये संपूर्ण यंत्रणा अडकून पडेल आणि दहा हजार कोटीची जी थकबाकी आहे ती वसूल करण्यामध्ये दिरंगाई होईल. पुणेकर प्रामाणिकपणे कर भरत आहेत. आपले बिल पोहोचले नाही तरी देखील बिल काढून पैसे भरतात.

क्षेत्रीय कार्यालयाची यंत्रणा यासाठी वापरणं योग्य नाही. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सवलत मिळत असलेल्या 100 मिळकतींची तपासणी केली तर आपल्याला यामध्ये वस्तुस्थितीचा अंदाज येऊ शकतो, असे वाटते.संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा या विषयाची तपासणी करण्यासाठी आणि नागरिकांनी पुन्हा सवलत मिळण्यासाठी अर्ज करण्याची आवश्यकता वाटत नाही.आपण याबाबत घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा तसेच जानेवारी दहा तारखेनंतर चर्चेसाठी वेळ द्यावा, अशी मागणी माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी केली  आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0