PMC Chief Security Officer | मुख्य सुरक्षा अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार उपायुक्त्त प्रतिभा पाटील यांच्याकडे!
PMC Chief Security Officer | पुणे महापालिकेच्या सुरक्षा विभागाच्या (PMC Security Department) मुख्य सुरक्षा अधिकारी (PMC Chief Security Officer) पदाची जबाबदारी उपायुक्त प्रतिभा पाटील (PMC Deputy Commissioner Pratibha Patil) यांच्याकडे देण्यात आली आहे. पाटील यांच्याकडे हा अतिरिक्त पदभार असणार आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी नुकतेच याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)
मुख्य सुरक्षा अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार या आधी उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांच्याकडे सोपवण्यात आला होता. माधव जगताप यांच्याकडे मूळ जबाबदारी ही अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाची आहे. नुकताच जगताप यांच्याकडे कर आकारणी व कर संकलन विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. कारण अजित देशमुख यांची सरकारकडून बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुख्य सुरक्षा अधिकारी पदाची जबाबदारी प्रशासनाकडून उपायुक्त प्रतिभा पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पाटील यांच्याकडे सद्यस्थितीत भूसंपादन व व्यवस्थापन विभागाची जबाबदारी आहे.