Pune Property Tax | मिळकत कर वसुलीसाठी दामिनी महिलांची 12 पथके | कर वसुलीसाठी पहिल्यांदाच महिलांना जबाबदारी
PMC Property Tax Department – (The Karbhari News Service) – पुणे शहरात कर संकलनाच्या अनुषंगाने दामिनी महिलांची 12 पथके तयार करण्यात आलेली आहे. प्रत्येक पथकामध्ये पाच महिलांचा समावेश असून त्यांचेमार्फत शहरातील थकबाकीदार मिळकतींची पाहणी करून वसुलीची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. अशी माहिती महापालिकेच्या करसंकलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली. (Pune Municipal Corporation property tax department)
हा प्रयोग प्रथमच राबवण्यात आलेला असून त्यासाठी अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. पथकाकडून दहा लाख इतके रक्कम थकबाकी जमा करण्यात आली असून तीन मिळकती जप्त करण्यात आलेले आहेत. महिला दिनाचे औचित्य साधत या महिलांवर ही वसूलीची जबाबदारी देण्यात आली आहे.
महापालिकेच्या मिळकतकर विभागास २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी २८०० कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. मात्र, या विभागास मार्च महिना अर्धा झाला असला तरी आतापर्यंत केवळ २१५० कोटी पर्यंतच मजल मारता आली असून पुढील १५ दिवसांत जवळपास साडेसहाशे कोटींची वसूली करायची आहे. त्यासाठी पालिकेकडून थकबाकीदारांना नोटीसा बजावण्यासह, बॅंड पथक आणि नियमित वसूली पथकांच्या माध्यमातून कर वसूल केला जात आहे.त्यात, आता महिला कर्मचाऱ्यांवरही थकबाकी वसुलीची जबाबदारी देण्यात आली आहे.
पेठ धायरी येथे मध्यवर्ती महिला वसुली पथक व टीम यांचे समवेत मिळकत कारवाईसाठी गेलो असता, मिळकतदाराकडून PDC व चालू चेकने वसुल.रक्कम रुपये एकूण -१ooooo/-मिळकत क्र. ओ/सी/०६/०५१५७९२४७ रक्कम रुपये एकूण -१३३१२५/- ओ/सी/०६/०१५७९१९८ तसेच ओ/सी/०६/०१५७९०२ प्रत्यक्ष घरी जाऊन ऑन लाईन रक्कम रुपये ३५६८९/- अशी एकूण रक्कम रुपये २,६८,८१४/- इतकी मिकतकर रक्कम ही महिला वसुली पथक प्रमुख वंदना पाटसकर, सर्व टीम प्रीती चव्हाण,शुभांगी खसासे वैशाली कामथे दिपाली चव्हाण गौतमी कोडम व सर्व विभागीय निरक्षक पेठ निरीक्षक चेतन मोकाशी यांच्या समवेत जमा केले.
COMMENTS