Pune RCC Seal | PMC कडून मोटेगावकर यांचे RCC कोचिंग क्लासेस सील! 

Homeadministrative

 Pune RCC Seal | PMC कडून मोटेगावकर यांचे RCC कोचिंग क्लासेस सील! 

Ganesh Kumar Mule May 20, 2026 8:32 PM

PMC Duct Policy | ओव्हरहेड केबल मुळे नागरिकांचा जीव धोक्यात | duct policy वर अमल करण्याची आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी 
PMC Pune Recruitment Exam Dates | महापालिका भरती परीक्षा | कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाच्या परीक्षेच्या तारखा ठरल्या  | जाणून घ्या सविस्तर!
Ramraksha Pathan Pune | Hemant Rasane | ७५ हजार पुणेकरांनी केले रामरक्षा पठण

 Pune RCC Seal | PMC कडून मोटेगावकर यांचे RCC कोचिंग क्लासेस सील!

 

Pune Breaking News – (The Karbhari News Service) –  नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणात अटकेत असलेले संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या डेक्कन परिसरातील कोचिंग क्लासेसवर पुणे महानगरपालिकेने धडक कारवाई केली आहे. अशी माहिती शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली. (Pune PMC News)

जंगली महाराज रस्त्यावरील बोरावके बिल्डिंगमध्ये चालणारे ‘Renukai Career Centre’ (RCC) म महापालिकेच्या पथकाने सील केले. हे क्लासेस विनापरवाना व ऑक्युपन्सी सर्टिफिकेट (OC) शिवाय सुरू होते. तपासणीत पार्किंगच्या जागेत मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरबदल केल्याचेही आढळून आले.

कोटींची कर थकबाकी, बुलडोझरचा वापर

PMC च्या अतिक्रमण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोठेगावकर यांच्याशी संबंधित मालमत्तांवर  मालमत्ता कर थकीत आहे. कारवाईदरम्यान इमारतीमधील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवण्यात आला.

CBI अटकेनंतर प्रशासनाची कारवाई

RCC चे मुख्य संचालक शिवराज मोठेगावकर यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) नीट पेपर लीक प्रकरणात यापूर्वीच अटक केली आहे. तपासात त्यांच्या मोबाईलमध्ये परीक्षेची मूळ प्रश्नपत्रिका सापडल्याने त्यांच्यावरील संशय बळावला होता. CBI च्या कारवाईनंतर PMC ने स्वतःहून नियमभंगाची दखल घेत ही कारवाई केली.

महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही कारवाई शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर व अधिक्षक अभियंता  प्रविण शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कार्यकारी अभियंता  सुरेंद्र कर्पे, उप अभियंता  रंजित मुटकुळे,  महेशकुमार शिंदे व शाखा अभियंता  विकास निबाळकर, आरेखक यावेळी उपस्थित होते.

पार्किंगमधील बांधकामावरही कारवाई:  
इमारतीमधील पार्किंगमध्ये असलेल्या अनधिकृत बांधकामावरही दंडात्मक कारवाई करून ते निष्कासित करण्यात आले आहे. ही कारवाई कार्यकारी अभियंता, बांधकाम विकास विभाग क्र. 6, पुणे मनपा यांनी केली असून कारवाईचे फोटोही सोबत जोडले आहेत. OC शिवाय वापर होणाऱ्या मिळकतींवर मनपाची धडक मोहीम सुरूच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: