Pune PMC News | डॉ. आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दिलासा; खानावळ डीबीटी २१५० वरून ३२०० रुपये करण्याचा निर्णय

Homeadministrative

Pune PMC News | डॉ. आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दिलासा; खानावळ डीबीटी २१५० वरून ३२०० रुपये करण्याचा निर्णय

Ganesh Kumar Mule Apr 30, 2026 8:27 PM

PMC Election Ward Structure | आज सायंकाळी महापालिका प्रारूप प्रभाग रचना होणार जाहीर! | क्षेत्रीय कार्यालयात लावले जाणार नकाशे
PMC Audit Sub-Committee | आकाशचिन्ह विभागाच्या ४०४ कोटी वसुलीची ऑडीट उपसमितीत चर्चा करणार | स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती 
PMC Standing Committee | शहर स्वच्छतेची जबाबदारी आता ठेकेदारांवर | रस्ते झाडणकामासाठी ४,७०९ कामगारांची वाढ

Pune PMC News | डॉ. आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दिलासा; खानावळ डीबीटी २१५० वरून ३२०० रुपये करण्याचा निर्णय

| स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – घोले रोड येथील पुणे महापालिका संचलित डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या खानावळीसाठीच्या थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समिती समोर ठेवण्यात आला होता. सध्या दिली जाणारी २ हजार १५० रुपयांची मासिक रक्कम अपुरी पडत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार लक्षात घेऊन ती ३२०० रुपये देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. (Shrinath Bhimale PMC)

महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या या वसतिगृहात सध्या सुमारे ४०० विद्यार्थी विविध शाखांमध्ये शिक्षण घेत आहेत. २०१७ पासून विद्यार्थ्यांना जेवणासाठी २ हजार १५० रुपये डीबीटी दिले जात आहेत. मात्र, वाढती महागाई आणि भोजनाचा वाढलेला खर्च लक्षात घेता ही रक्कम अपुरी असल्याचे विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले होते. विद्यार्थ्यांनी दरमहा ४ हजार १५० रुपयांची मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २६ डिसेंबर २०२४ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार भोजन भत्त्याची मर्यादा लक्षात घेऊन महापालिकेने डीबीटी रक्कम ३ हजार २०० रुपये करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे.

सदर खर्चासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात समाज विकास विभागाच्या विविध अर्थशीर्षकांअंतर्गत एकूण १.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार सध्या प्रवेशित १५७ विद्यार्थ्यांसाठी दरमहा सुमारे ५.०२ लाख रुपये खर्च अपेक्षित असून वार्षिक खर्च सुमारे ४०.१९ लाख रुपये होणार आहे.

डीबीटी वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीमार्फत मुख्य सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असून मंजुरी मिळाल्यानंतर सुधारित रक्कम अंमलात येणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: