PMC Standing Committee | शिंदेवाडी येथे नवा बॅच मिक्स प्लांट उभारण्याचा मार्ग मोकळा

Homeadministrative

PMC Standing Committee | शिंदेवाडी येथे नवा बॅच मिक्स प्लांट उभारण्याचा मार्ग मोकळा

Ganesh Kumar Mule Apr 30, 2026 8:56 PM

Property Tax | PMC | 5 ते 10% सवलतीत मिळकतकर भरण्यासाठी 3 जून पर्यंत मुदतवाढ 
PMC Ranking | PMC Pune Health Schemes | आरोग्य योजनांमध्ये पुणे महापालिकेची रँकिंग 4 थ्या वरून 3 ऱ्या स्थानावर
Union Budge 2024 | लोकशाही सक्षमीकरणासाठी 500 कोटींची तरतूद आवश्यक | केंद्रीय जनअर्थसंकल्प जाहीर

PMC Standing Committee | शिंदेवाडी येथे नवा बॅच मिक्स प्लांट उभारण्याचा मार्ग मोकळा

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – शहरातील रस्ते कामांसाठी लागणाऱ्या डांबरी मिक्सच्या पुरवठ्यातील अडचणी दूर करण्यासाठी पुणे महापालिकेकडून शिंदेवाडी येथे नवीन बॅच मिक्स प्लांट उभारण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाल समितीने मान्यता दिली. अशी माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. दरम्यान, १६० टीपीएच क्षमतेचा हा प्लांट उभारल्यास दक्षिणेकडील भागांना डांबरी मालाचा पुरवठा जलद गतीने होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Shrinath Bhimale PMC)

सध्या येरवडा येथे १२० टीपीएच क्षमतेचा बॅच मिक्स प्लांट कार्यरत असून तो २०१६ पासून सुरू आहे. या प्लांटमधून आतापर्यंत सुमारे ७ ते ७.५ लाख मेट्रिक टन डांबरी मिक्सचे उत्पादन झाले आहे. मात्र, सततच्या वापरामुळे यंत्रणेची झीज झाल्याने प्लांट वारंवार बंद पडत असून मागणीनुसार पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत.
या पार्श्वभूमीवर नवीन १६० टीपीएच क्षमतेचे दोन बॅच मिक्स प्लांट उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी एक प्लांट येरवडा येथे उभारण्याचे काम सुरू असून दुसरा प्लांट शिंदेवाडी येथे उभारण्याचा प्रस्ताव आहे. या कामासाठी मे. पार्कर प्लांट इंडिया प्रा. लि. या संस्थेला कार्यादेश देण्यात आले आहेत.

शिंदेवाडी येथील सुमारे ५.३६ एकर जागा सध्या पीएमपीएमएलकडे असून त्या ठिकाणी जुने टायर, ड्रम आणि बंद पडलेली वाहने यासारखा भंगार माल साठवून ठेवण्यात येत आहे. या जागेचा उपयोग करून नवीन प्लांट उभारल्यास उपलब्ध जागेचा कार्यक्षम वापर होणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे.

प्रस्तावित प्लांटमुळे नांदे, धायरी, आंबेगाव, खडकवासला, कात्रज, कोंढवा, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता, वारजे, वानवडी तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या दक्षिणेकडील गावांमध्ये डांबरी मालाचा त्वरित पुरवठा करणे शक्य होणार आहे. तसेच येरवडा येथील विद्यमान प्लांटवरील ताण कमी होण्यास मदत होईल. या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांची मान्यता असून, पुढील प्रक्रियेनंतर प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळणार आहे. असे भिमाले यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: