PMC Divyang Therapy Center | दळवी रुग्णालयात विशेष दिव्यांगांसाठी थेरपी सेंटर | ‘लायन्स क्लब ऑफ पूना आय फाउंडेशन’ची निवड

Homeadministrative

PMC Divyang Therapy Center | दळवी रुग्णालयात विशेष दिव्यांगांसाठी थेरपी सेंटर | ‘लायन्स क्लब ऑफ पूना आय फाउंडेशन’ची निवड

Ganesh Kumar Mule Jul 23, 2026 10:27 PM

Maratha Reservation | मंत्रालयात स्वतंत्र मराठा आरक्षण कक्षाची स्थापना | ‘सारथी’ची कामे आता सचिव स्तरावर जलद मार्गी लागतील : सचिन आडेकर
PMC Pune Assistant Health Officer | राजेश दिघे पदोन्नतीने होणार सहायक आरोग्य अधिकारी
Rahul Gandhi Pune Tour | पुण्यात 22 ऑगस्टला राहुल गांधींचा “छात्रो की गुंज” कार्यक्रम | विद्यार्थ्यांशी करणार संवाद

PMC Divyang Therapy Center | दळवी रुग्णालयात विशेष दिव्यांगांसाठी थेरपी सेंटर | ‘लायन्स क्लब ऑफ पूना आय फाउंडेशन’ची निवड

 

PMC Dalvi Hospital – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने शिवाजीनगर येथील डॉ. दळवी रुग्णालयात विशेष दिव्यांगांसाठी सर्वसमावेशक थेरपी सेंटर सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, हा उपक्रम राबविण्यासाठी लायन्स क्लब ऑफ पूना आय फाउंडेशन या संस्थेची निवड करण्याचा प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली. या केंद्रामध्ये दिव्यांगांसाठी विविध प्रकारच्या थेरपी, उपचार आणि समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. तसेच हा उपक्रम विभागाच्या सूचनेनुसार सूर राहणार असल्याचेही ते म्हणाले. (Shrinath Bhimale PMC Standing Committee)

महापालिका आयुक्तांच्या ८ डिसेंबर २०२५ रोजीच्या मंजुरीनंतर समाज विकास विभागाने ५ डिसेंबर २०२५ रोजी अनुभवी सेवाभावी संस्थांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यास दोन संस्थांनी प्रतिसाद दिला. लायन्स क्लब ऑफ पूना आय फाउंडेशन आणि स्फेरूल फाउंडेशन या संस्थांचे प्रस्ताव प्राप्त झाले. प्रस्तावांची छाननी केल्यानंतर लायन्स क्लब ऑफ पूना आय फाउंडेशनने आवश्यक सर्व कागदपत्रे सादर केल्याचे, तसेच दिव्यांग, आरोग्य, शिक्षण, पुनर्वसन आणि सामाजिक विकास क्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभव असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

दुसरीकडे, स्फेरूल फाउंडेशनकडून आवश्यक नोंदणी प्रमाणपत्र आणि जाहिरातीनुसार अपेक्षित कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याचे, तसेच दिव्यांग क्षेत्रातील आवश्यक अनुभवही नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे अनुभवी संस्था म्हणून लायन्स क्लब ऑफ पूना आय फाउंडेशनची निवड करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

प्रस्तावानुसार केंद्रामध्ये बालरोग मज्जासंस्था सल्ला, मानसिक मूल्यांकन, स्पीच थेरपी, व्यावसायिक थेरपी, फिजिओथेरपी, वर्तन सुधारणा थेरपी, आनुवंशिक सल्ला, ऑडिओलॉजिकल चाचण्या, पीटीए, विशेष शिक्षण, उपचारात्मक थेरपी, बेरा आणि ईईजी अशा एकूण १३ सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या सेवांसाठी २०० रुपयांपासून १,२०० रुपयांपर्यंत जीएसटीसह शुल्क निश्चित करण्याचा प्रस्ताव आहे.

भविष्यात दिव्यांग विद्यार्थ्यांना किंवा रुग्णांना आणखी उपचार पद्धतींची आवश्यकता भासल्यास आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनानुसार नवीन थेरपी सुरू करण्यास आणि त्यांचे दर महापालिका आयुक्तांच्या मंजुरीने निश्चित करण्याची तरतूदही प्रस्तावात करण्यात आली आहे. केंद्राचे दैनंदिन व्यवस्थापन, स्वच्छता, उपकरणांची देखभाल आणि थेरपी सेवा संबंधित संस्था स्वतःच्या खर्चाने चालविणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

विशेष म्हणजे, पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी तसेच महापालिकेच्या रुग्णालयांतून संदर्भित करण्यात आलेल्या रुग्णांकडून प्रस्तावित शुल्काच्या केवळ ५० टक्के रक्कम आकारण्यात येणार आहे. उर्वरित खर्च महापालिकेच्या दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत संबंधित अर्थशीर्षातून अदा करण्यात येणार असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: