Pune PMC News | महापालिकेचे आरोग्य निरिक्षक, मोकादम यांच्यावर दंडात्मक कारवाई | कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका
| उपायुक्त संतोष वारुळे यांच्याकडून सक्त कारवाई
Santosh Warule Deputy Commissioner – (The Karbhari News Service) – स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात काम करणाऱ्या वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरिक्षक आणि मोकादम अशा ४ लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. परिमंडळ २ चे उपायुक्त संतोष वारुळे यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे. यापुढे कामात सुधारणा न झाल्यास अजून कडक कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त वारुळे यांनी दिला आहे. (Shivajinagar Ghole Road Ward Office PMC)
महापालिका आयुक्त नवल किशोर राम हे शहरात प्रत्यक्ष पाहणी करून कामकाजाचा आढावा घेत आहेत. दोन दिवसापूर्वीच कामात हलगर्जी केल्याबद्दल त्यांनी सहाय्यक आयुक्त यांची बदली केली होती. हडपसर, नगर रोड क्षेत्रीय कार्यालय मधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार आता शिवाजी नगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई केली गेली आहे.
१. वरीष्ठ आरोग्य निरिक्षक सुनील कांबळे – ५ हजार दंड
कांबळे हे शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात वरीष्ठ आरोग्य निरीक्षक म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रभागातील स्वच्छता विषयक कामकाज करणे, तसेच आरोग्य निरिक्षक आणि मोकादम यांच्यावर नियंत्रण ठेवणे हे काम त्यांच्याकडे आहे. मात्र महापालिका आयुक्त यांच्या पाहणी दौऱ्यात दीप बंगला चौक ते वडारवाडी रस्ता परिसरात अस्वच्छता दिसून आली. याबाबत आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे कांबळे यांच्यावर कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांना ५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
२ . आरोग्य निरीक्षक- संगीता बदामी – ४ हजार दंड
बदामी या शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात आरोग्य निरीक्षक म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रभागातील स्वच्छता विषयक कामकाज करणे, तसेच बिगारी आणि मोकादम यांच्यावर नियंत्रण ठेवणे हे काम त्यांच्याकडे आहे. मात्र महापालिका आयुक्त यांच्या पाहणी दौऱ्यात दीप बंगला चौक ते वडारवाडी रस्ता परिसरात अस्वच्छता दिसून आली. याबाबत आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे बदामी यांच्यावर कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांना ४ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
३. मोकादम राज साळवी – २ हजार दंड
साळवी हे शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात मोकादम म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रभागातील स्वच्छता विषयक कामकाज करणे, तसेच बिगारी यांच्यावर नियंत्रण ठेवणे हे काम त्यांच्याकडे आहे. मात्र महापालिका आयुक्त यांच्या पाहणी दौऱ्यात दीप बंगला चौक ते वडारवाडी रस्ता परिसरात अस्वच्छता दिसून आली. याबाबत आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे साळवी यांच्यावर कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांना २ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
४. मोकादम ललित मकवानी – २ हजार दंड
मकवाणी हे शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात मोकादम म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रभागातील स्वच्छता विषयक कामकाज करणे, तसेच बिगारी यांच्यावर नियंत्रण ठेवणे हे काम त्यांच्याकडे आहे. मात्र महापालिका आयुक्त यांच्या पाहणी दौऱ्यात दीप बंगला चौक ते वडारवाडी रस्ता परिसरात अस्वच्छता दिसून आली. याबाबत आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे साळवी यांच्यावर कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांना २ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
—-
दंडात्मक कारवाई ही संबंधित कर्मचाऱ्यांना एकवेळ ची समज आहे. यापुढे कामात सुधारणा नाही झाली तर नियमानुसार याहून अधिक कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
– संतोष वारुळे, उपायुक्त, परिमंडळ २

COMMENTS