Pune PMC News | प्रसाद काटकर यांची पुन्हा उपायुक्त पदावर नियुक्ती!
| महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार नियुक्ती
Prasad Katkar PMC – (The Karbhari News Service) – प्रसाद काटकर यांची पुन्हा एकदा बदली करून त्यांना पुणे महापालिका उपायुक्त (PMC Deputy Commissioner) पदी नियुक्त करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (Maharashtra Administrative Tribunal – MAT) आदेशानुसार राज्य सरकारकडून ही नियुक्ती करण्यात आली आहे. (PMC Deputy Commissioner)
मुख्याधिकारी गट अ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या सरकार कडून करण्यात आल्या आहेत. त्यात काटकर यांचा देखील समावेश आहे. काटकर हे पूर्वी पुणे महापालिकेत उपायुक्त पदावर काम पाहत होते. मात्र २१ मार्च २०२३ रोजी सरकारने त्यांची बदली करून त्यांना इचलकरंजी महापालिकेत उपायुक्त या पदावर नियुक्ती दिली होती. याबाबत काटकर यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायाधिकरणाने दिलेले १ ऑक्टोबर २०२४ चे आदेश विचारात घेत काटकर यांना सरकारने पुणे मनपात उपयुक्त पदावर पदस्थापना दिली आहे.
COMMENTS