PMC Municipal Bond – २४०० कोटी रुपयांच्या ठेवी बॅंकेत असताना ३०० कोटींचे कर्जरोखे काढण्याची पुणे महापालिकेला गरजच काय?
| विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला सवाल
PMC Budget 2025-26 – (The Karbhari News Service) – येत्या चार महिन्यांत mature होऊ घातलेल्या २४०० कोटी रुपयांच्या ठेवी बॅंकेत असताना ३०० कोटींचे कर्ज काढायचे डोहाळे पुणे महापालिकेला लागतातच कसे? असा सवाल सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी उपस्थी केला आहे. (Pune Municipal Corporation Budget)
वेलणकर म्हणाले कि, २०२५-२६ साठीचे पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक काल पुणे महापालिका आयुक्तांनी मांडले. यामध्ये महापालिका ३०० कोटी रुपयांचे कर्जरोखे काढणार असल्याचे घोषित केले गेले आहे. दोनच दिवसांपूर्वी महापालिकेने मला माहिती अधिकारात दिलेल्या माहितीनुसार जुलै २०२५ अखेरपर्यंत पुणे महापालिकेच्या विविध बॅंकांमधील २४०० कोटी रुपयांच्या मुदत ठेवी mature होत आहेत. याशिवाय डिसेंबर २०२५ पर्यंत आणखी ७०० कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आणि सप्टेंबर २०२५ पर्यंत १९० कोटींचे रोखे mature होत आहेत. असे असतानाही फक्त ३०० कोटींसाठी भरमसाठ व्याजाने कर्जरोखे काढण्याची गरजच काय आहे? म्हणजे बॅंकेत कमी व्याजाने पैसे मुदत ठेवी मध्ये ठेवायचे आणि जास्ती व्याजाने कर्ज काढायचे हा तुघलकी कारभार महापालिका करतीये. असा आरोप वेलणकर यांनी केला आहे.
फक्त ३०० कोटींसाठी भरमसाठ व्याजाने कर्जरोखे काढण्याची गरजच काय आहे? म्हणजे बॅंकेत कमी व्याजाने पैसे मुदत ठेवी मध्ये ठेवायचे आणि जास्ती व्याजाने कर्ज काढायचे हा तुघलकी कारभार महापालिका करतीये.
विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे
COMMENTS