Pune PMC News | ऑडिट उपसमिती वर ८ तर अपील उपसमिती वर ७ सदस्यांची नियुक्ती!

Homeadministrative

Pune PMC News | ऑडिट उपसमिती वर ८ तर अपील उपसमिती वर ७ सदस्यांची नियुक्ती!

Ganesh Kumar Mule Apr 09, 2026 6:36 PM

PMC Property Tax Bill | मिळकतकर देयकांची छपाई बँकेमार्फत | महापालिकेचा लाखो रुपयांचा खर्च वाचणार असल्याचा दावा 
Shrinath Bhimale PMC Standing Committee | हडपसर-काळबोराटेनगर पादचारी भुयारी मार्गास मान्यता | साडेपाच कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता
PMC CHS Scheme | आजी-माजी नगरसेवक, पीएमपीएमएल व शिक्षण मंडळ सदस्यांना ‘अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजने’चा कायमस्वरूपी लाभ!

Pune PMC News | ऑडिट उपसमिती वर ८ तर अपील उपसमिती वर ७ सदस्यांची नियुक्ती!

| स्थायी समिती बैठकीत करण्यात आली नियुक्ती

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – स्थायी समितीच्या  बैठकीत ऑडीट उपसमिती आणि अपिल उपसमितीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार ऑडिट उपसमिती वर ८ तर अपील उपसमिती वर ७ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २४(२) अन्वये स्थायी समितीपुढे येणाऱ्या अपिल अहवालावर निर्णय घेण्याकरीता स्थायी समिती सभासदांची एक उपसमिती नियुक्त करते. यामध्ये महापालिका कर्मचारी आणि अधिकारी हे आपल्या एखाद्या प्रकरणा बाबत अपील करत असतात.  त्याचप्रमाणे स्थायी समितीपुढे येणाऱ्या ऑडीट अहवालावर निर्णय घेण्याकरीता स्थायी समिती सभासदांची एक उपसमिती नियुक्त करते. महापालिका मुख्य लेखापरीक्षक आपले विविध अहवाल या समिती समोर ठेवतात.  या दोन्ही  समितीत कमीत कमी तीन सदस्य असावेत, असा नियम आहे. दरम्यान आता नियुक्त केलेल्या सदस्या मधून अध्यक्ष निवडला जाणार आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

 

| ऑडिट उपसमितीवर नियुक्त करण्यात आलेले सदस्य

१. प्रशांत जगताप

२. मयुरी कोकाटे

३. निशा मानवतकर

४. अमोल बालवडकर

५. वृषाली कामठे

६. जयश्री भुमकर

७. डॉ दादा कोद्रे

८. रत्नमाला सातव

| अपील उपसमिती वर नियुक्त करण्यात आलेले सदस्य

१. विशाल धनवडे

२. रुपाली धाडवे

३. संदीप बेलदरे

४. कालिंदा पुंडे

५. प्राची आल्हाट

६. सुहास टिंगरे

७. वैशाली बनकर

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0