Chandani Chowk Bhugaon Road | चांदणी चौक – भूगाव मार्ग – २०० कोटींची रक्कम तीन वर्षात टप्प्याटप्प्याने उपलब्ध केली जाणार!

Homeadministrative

Chandani Chowk Bhugaon Road | चांदणी चौक – भूगाव मार्ग – २०० कोटींची रक्कम तीन वर्षात टप्प्याटप्प्याने उपलब्ध केली जाणार!

Ganesh Kumar Mule Mar 26, 2026 1:46 PM

PMC Shahari Garib Yojana | शहरी गरीब योजनेची मर्यादा 1 लाख 60 हजार करण्यास स्थायी समितीची मान्यता | मुख्य सभेसमोर प्रस्ताव
PMC Chief Engineer | महापालिकेत आता मुख्य अभियंता पदावर पदोन्नतीसाठी अनुभवाची अट 5 वरून 3 वर्षांवर!
PMC Security Department | सुरक्षा विभागाला वाढीव ३५० सुरक्षा रक्षक | खर्च वाढला नसला तरी निविदेचा कालावधी मात्र केला कमी! 

Chandani Chowk Bhugaon Road | चांदणी चौक – भूगाव मार्ग – २०० कोटींची रक्कम तीन वर्षात टप्प्याटप्प्याने उपलब्ध केली जाणार!

| ७२ ब नुसार रक्कम उपलब्ध करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती मार्फत मुख्य सभेसमोर

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – चांदणी चौक-भूगाव मार्गाच्या पुनर्विकासाला आता गती मिळणार आहे. पुणे महापालिकेने या मार्गासाठी तब्बल २००  कोटी रुपयांचा महत्वाकांक्षी आराखडा तयार केला आहे. दरम्यान ही रक्कम आगामी तीन वर्षात टप्प्याटप्प्याने अर्थसंकल्पात उपलब्ध केली जाणार आहे. ७२ ब नुसार रक्कम उपलब्ध करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे.  (PMC Projects Department)

या मार्गावरील वाहतूक कोंडी नेहमीची होऊन बसली आहे. सध्या आसपासचा परिसर अंदाजे ९० हजार लोकसंख्येचा असून पुढील काही वर्षांत हा आकडा दोन ते तीन लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत वाहतूक नियोजन तातडीने करावे लागणार आहे. या दृष्टीने प्रकल्पाच्या डिटेल प्लॅनिंगसाठी मेसर्स पेंटॅकल कन्सल्टंट्स प्रा. लि.ची ३० जुलै रोजी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात कामासाठी १६ कोटींची तरतूद करण्यात आली असून फेज १ अंतर्गत ६७.८५ कोटी आणि फेज २ अंतर्गत १३५.७६ कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत.

या रस्त्याची नियमानुसार रुंदी ६० मीटर असायला हवी; मात्र प्रत्यक्षात ती केवळ १० मीटर आहे. मर्यादित रुंदीमुळे सततची कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढत असताना, यावर उपाय म्हणून तीन महत्त्वाच्या चौकांवर उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पीव्हीपीआयटी कॉलेज चौकातील प्रस्तावित ग्रेड सेपरेटर ४३० मीटर लांबीचा असून १२० मीटर भाग आरसीसी स्ट्रक्चरचा असेल. २३.२ मीटर रुंदीच्या या स्ट्रक्चरसाठी २७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

एम्ब्रोसिया चौक व पाटील नगर चौकातील उड्डाणपूल ८७० मीटर लांबीचा असणार असून त्यातील ५४४ मीटर भाग आरसीसी असेल. २३.२ मीटर रुंदीच्या या पुलासाठी सुमारे ८२ कोटी रुपये खर्च येणार आहे. हा पूल सुरू झाल्यानंतर चांदणी चौक ते भूगावदरम्यानचा प्रवास वेळ लक्षणीय कमी होईल, असा दावा आहे. त्याशिवाय राम नदीवरील ३० मीटर लांबीचा आणि ७० मीटर रुंदीचा पूल उभारण्यात येणार असून नदीपात्र ओलांडताना होणारी कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. पिरंगुट, रोहा, भागड, माणगावसारख्या औद्योगिक भागांना आणि हिंजेवाडी आयटी पार्कला जोडणारा हा मार्ग विकसित झाल्यास पश्चिम पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल दिसतील.

त्यानुसार चांदणी चौक ते भुगाव मार्ग विकसित करणे आणि त्यावर उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर बांधण्याच्या कामासाठी ७२ ब नुसार आगामी तीन वर्षात २०० कोटींची रक्कम टप्प्या टप्प्याने उपलब्ध केली जाणार आहे. स्थायी समिती मार्फत हा प्रस्ताव मुख्य सभेसमोर ठेवला जाणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: