PMC Standing Committee | डेक्कनमधील संभाजी महाराज स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी ३.२४ कोटी  | स्थायी समितीची मान्यता 

Homeadministrative

PMC Standing Committee | डेक्कनमधील संभाजी महाराज स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी ३.२४ कोटी | स्थायी समितीची मान्यता 

Ganesh Kumar Mule May 07, 2026 7:49 PM

PMC Pune Census | १६ मे ते १४ जून  या कालावधीत महापालिका पुण्यात करणार जनगणना!
Urban Poor Medical Scheme | शहरी गरीब वैद्यकीय योजना | उत्पन्न मर्यादेबाबत पुणे महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय 
Mukta Tilak Memorial Day | क्रांतिकारक संग्रहालयाचे आज 11 वाजता लोकार्पण

PMC Standing Committee | डेक्कनमधील संभाजी महाराज स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी ३.२४ कोटी  | स्थायी समितीची मान्यता

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – डेक्कन परिसरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसराच्या सुशोभीकरणासाठी महापालिकेने ३ कोटी २४ लाख रुपयांच्या कामास कामास महापालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे. कामास महापालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे. या अंतर्गत दगडी मेघडंबरी उभारणे, भुयारी मार्गाचे सुशोभीकरण तसेच परिसर विकासाची विविध कामे करण्यात येणार आहेत. संबंधित प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. (Shrinath Bhimale PMC)

महापालिकेच्या भवन विभागामार्फत हे काम राबविण्यात येणार असून, मे. महिम्ना कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे. कंपनीने २ कोटी ७४ लाख २५ हजार रुपयांची निविदा सादर केली असून, ती अंदाजपत्रकापेक्षा ३.९ टक्के अधिक आहे. जीएसटी, मटेरिअल टेस्टिंग शुल्क आणि अन्य खर्च धरून या प्रकल्पाचा एकूण खर्च ३ कोटी २४ लाख ३७ हजार ७०३ रुपये इतका होणार आहे. भविष्यातील भाववाढ आणि मूल्यवाढीचा फरक स्वतंत्रपणे अदा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या कामासाठी महापालिकेने ३ कोटी १२ लाख २३ हजार रुपयांचे पूर्वगणनपत्रक तयार केले होते. तांत्रिक छाननी समितीने २० नोव्हेंबर २०२५ रोजी या अंदाजपत्रकास मान्यता दिली होती. त्यानंतर २ कोटी ६३ लाख ९४ हजार रुपयांच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.

फेरनिविदेची जाहिरात १४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. २५ मार्च ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत निविदा प्रक्रिया पार पडली. प्राप्त निविदांमधून संबंधित कंपनीची निवड करण्यात आली आहे.

या प्रकल्पाअंतर्गत स्मारक परिसरात दगडी बांधकाम स्वरूपातील मेघडंबरी उभारली जाणार असून, भुयारी मार्ग अधिक आकर्षक करण्याबरोबरच परिसराचा विकास करण्यात येणार आहे. डेक्कन परिसराचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन स्मारकाचे जतन आणि सुशोभीकरण करण्यावर भर देण्यात येत असल्याचे भिमाले यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0