Pune PMC Budget 2025-26 | पुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मंत्रालयात तयार करावा
| माजी नगरसेवक संजय बालगुडे यांची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी
Pune Municipal Corporation Budget – (The Karbhari News Service) – यंदाचा पुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प (PMC Budget) विभागीय आयुक्त कार्यालयात (Divisional Commissioner office) तयार होत आहे . महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बैठका विभागीय कार्यालयात होत आहे. हा सर्व प्रकार पुणेकरांच्या मनात संशय कल्लोळ तयार करणार आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेचा (Pune Municipal Corporation – PMC) अर्थसंकल्प मंत्रालयात तयार करावा. अशी मागणी माजी नगरसेवक संजय बालगुडे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Pune PMC News)
बालगुडे यांच्या निवेदनानुसार पुणे महानगरपालिकेचा सन 2025-26 चा अर्थसंकल्प तयार करण्याचे काम प्रतिवर्षीप्रमाणे सुरू असते. खाते प्रमुख आपल्या खात्याची कामे व लोकप्रतिनिधी त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातील कामे सुचवत असतात. अर्थसंकल्प आयुक्तांसह सर्व अधिकारी महापालिकेच्या इमारतीमध्ये बैठक घेऊन तयार करतात ही प्रथा गेली 75 वर्षे सुरू आहे. परंतु यंदाचा अर्थसंकल्प विभागीय आयुक्त कार्यालयात तयार होत आहे . महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बैठका विभागीय कार्यालयात होत आहे. हा अर्थसंकल्प पुणेकरांच्या साठी विविध योजना प्रकल्प दैनंदिन सुविधा विषयासंबंधीत असतो. येथे विभागीय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी यांचा हस्तक्षेप नसतो.
परंतु यंदा नवीनच प्रथा व पायंडा पाडला जात आहे. अर्थसंकल्प तयार करण्याच्या बैठका विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात येत आहे. महापालिकेच्या स्वतंत्र अस्तित्व आहे .त्यामुळे हे कोणीतरी मंत्र्याच्या दबावामुळे विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक होत आहे.ही केवळ पुणे मनपाचे अवमूल्यन नाही, तर संपूर्ण पुणेकर नागरिकांचा अपमान आहे.
महापालिका आयुक्तांनी हे कोणाच्या दबावाखाली काम चालू आहे त्या राजकीय नेते व मंत्र्यांची नावे जाहीर करावी. तसेच कोणत्या नेत्यांना किती बजेट मागितले आहे? हे सुद्धा जाहीर करावे आमच्या माहितीप्रमाणे मोजक्या आठ ते दहा पुढाऱ्यांनी दोन हजार कोटी रुपये बजेट मागितले आहे. त्यांची सुद्धा नावे जाहीर करावी किंवा त्यांनाच मंत्रालयात पुणे मनपाचे बजेट तयार करायला सांगावे. असे बालगुडे यांनी म्हटले आहे.
COMMENTS