PMC Employees Agitation | आयकर दंडाच्या विरोधात महापालिका कर्मचारी शुक्रवारी करणार निदर्शने!

Homeadministrative

PMC Employees Agitation | आयकर दंडाच्या विरोधात महापालिका कर्मचारी शुक्रवारी करणार निदर्शने!

Ganesh Kumar Mule Feb 12, 2025 9:13 PM

Pune PMC Officers | संदीप खलाटे यांचे पुनर्वसन; तर एका प्रशासन अधिकाऱ्याला सहाय्यक आयुक्त पदाचा दर्जा! | महापालिका आयुक्तांच्या निर्णयाने कर्मचारी वर्गाला दिलासा
PMC Retired Employee | सेवानिवृत्त कर्मचाऱ्या बाबत महापालिका प्रशासनाचे महत्वाचे आदेश!
PMC Pune Employees Promotion | उपअधिक्षक पदाची पदोन्नती लटकली | सरकारने मान्यता देऊन देखील ६ महिन्यांपासून पदोन्नती नाही 

PMC Employees Agitation | आयकर दंडाच्या विरोधात महापालिका कर्मचारी शुक्रवारी करणार निदर्शने!

 

PMC Employees – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका (Pune Municipal Corporation – PMC ) सेवकांचे आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक नसल्यामुळे आयकर विभागाकडून  (Income Tax Department) मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात आलेला आहे. तो दंड रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) च्या वतीने  शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजता आयकर भवन, स्वारगेट येथे निदर्शने आयोजित करण्यात आलेली आहेत. अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. (Pune PMC News)

पुणे महापालिका सेवकांचे आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक नसल्यामुळे आयकर विभागाच्या वतीने  मोठ्या प्रमाणात दंड झालेला आहे. तो दंड रद्द करण्यात यावा व आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करून घेऊन कायदेशीर जी टॅक्सची रक्कम आहे तेवढीच घेण्यात यावी. या मागणी करता निदर्शने आयोजित करण्यात आलेली आहेत. तरी सर्व दंड लागलेल्या कामगारांनी मोठ्या संख्येने आयकर भवन,स्वारगेट येथे दुपारी 3 वाजता जमावे. असे आवाहन कॉ.उदय भट (अध्यक्ष), कॉ.मुक्ता मनोहर (जनरल सेक्रेटरी), कॉ.मधुकर नरसिंगे (कार्याध्यक्ष) यांनी केले आहे.

आधार-पॅन लिंक (PAN Aadhaar Link) करण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) एक मुदत ठरवून दिली होती. मात्र या कालावधीत हे काम न केल्याने आणि मुदतीत आयकर (Income tax) न भरल्याचा आर्थिक फटका पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना (Pune Municipal Corporation Employees) बसण्याची चिन्हे आहेत. कारण आयकर विभागाकडून दंडाच्या नोटीसा मिळण्यास सुरुवात झाली आहे. याचा विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0