Pune News | तीन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

File Photo

Homeadministrative

Pune News | तीन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

Ganesh Kumar Mule Jul 15, 2026 9:12 PM

Pramod Nana Bhangire on Pune Rain | पहिल्याच पावसात पुणे जलमय | ‘कोट्यवधींचा निधी गेला कुठे?’ प्रमोद नाना भानगिरे यांचा सवाल
Pune Water Issue | पुणे उत्तर-पूर्व भागातील गढूळ आणि पिवळसर पाणी समस्या दोन दिवसांत सुटणार |  आयुक्त नवल किशोर राम यांची कुरुळी जलशुद्धीकरण केंद्राला भेट
Dr Siddharth Dhende | येरवड्यात सरकारी इमारतीचे नियमबाह्य बांधकाम |  संरक्षण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र नाही | महापालिकेने बजावलेल्या कामबंदीची नोटीसीला केराची टोपली

Pune News | तीन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

 

Pune Breaking News – (The Karbhari News Service) – महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या पुणे–शिरूर द्रुतगती महामार्ग, हडपसर–यवत उन्नत मार्ग आणि तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्ग या तीन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज घेतला. (Marathi News)

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित यंत्रणा व स्थानिक लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या तीनही प्रकल्पांचे भूमिपूजन शनिवार, दि. १८ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता गणेश कला क्रीडा मंच, पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.

बैठकीस कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार सर्वश्री राहुल कुल, सुनील कांबळे, शरद सोनवणे, ज्ञानेश्वर कटके, योगेश टिळेकर, चेतन तुपे, बापूसाहेब पठारे, हेमंत रासने, सुनील शेळके, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभाग नोंदविला.

यावेळी मंत्री श्री. भोसले म्हणाले, पुणे परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन हे तीन प्रकल्प हाती घेण्यात आले असून, त्यांची प्रभावी आणि वेळेत अंमलबजावणी करण्यात येणार आहे. हडपसर–यवत रस्ते प्रकल्प महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ आणि मेट्रो प्रशासनाच्या समन्वयातून राबविण्यात येणार असून, वाहतूक व्यवस्थापनाबाबत पुणे महानगरपालिका व वाहतूक पोलिसांची स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. सर्व प्रकल्पांची कामे चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रकल्पांच्या अंमलबजावणीदरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना व अपेक्षांचा योग्य विचार केला जाईल, असे सांगितले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी पालखी मार्गावरील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याची सूचना केली, तर खासदार अमोल कोल्हे यांनी पुणे–शिरूर रस्ते प्रकल्पासाठी सर्वसमावेशक वाहतूक आराखडा तयार करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

बैठकीत महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे मुख्य अभियंता रणजीत हांडे यांनी सादरीकरणाद्वारे तीनही प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: