Pune Municipal Corporation (PMC) Water Supply Complaint | नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालय परिसरात नागरिकांचे पाण्याचे हाल! | PMC CARE वर तक्रारींची दखल घेतली जाईना

HomeBreaking Newsपुणे

Pune Municipal Corporation (PMC) Water Supply Complaint | नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालय परिसरात नागरिकांचे पाण्याचे हाल! | PMC CARE वर तक्रारींची दखल घेतली जाईना

गणेश मुळे Jan 25, 2024 3:48 AM

I Love My Pune, Because…  | पुण्यातील ऐतिहासिक ठिकाणांचे फोटो काढा आणि पुणे महापालिकेकडून बक्षिस जिंका! 
PMC IT Department | पुणे महापालिका अजून होणार हायटेक! (High-tech PMC) | कामकाजात आणखी गतिमानता आणली जाणार 
PMC Care | महापालिकेच्या नव्या स्वरुपातील ‘पीएमसी केअर’चे उद्घाटन!

Pune Municipal Corporation (PMC) Water Supply Complaint | नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालय परिसरात नागरिकांचे पाण्याचे हाल! | PMC CARE वर तक्रारींची दखल घेतली जाईना

Pune Municipal Corporation (PMC) Water Supply Complaint | नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत (PMC Nagar Road Zonal office) येणाऱ्या सर्व्हे नंबर 48/3, क्रांती नगर, आनंद पार्क बस स्टॉप जवळ, वडगावशेरी पुणे (Wadgaonsheri Pune) या भागात, साधारण डिसेंबर 2023 पासून काही  घरांना अपुरा पाणीपुरवठा होत आहे. मुख्य वाहिनीपासून आतल्या बाजूस 10 ते 15 मीटर आत असणाऱ्या घरांना याचा प्रामुख्याने फटका बसत आहे. कमी झालेला पाण्याचा दाब हे याचं मुख्य कारण आहे. दरम्यान याबाबत नागरिकांनी PMC CARE वर तक्रारी करून देखील त्याची दखल घेतली जात नाही. अशा परिस्थितीत नागरिकांनी काय करायचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Pune Municipal Corporation Water Supply Complaint)
याबाबत पाण्याचा दाब कमी होण्याची तांत्रिक कारणे शोधणे आवश्यकचं आहे पण त्याच्या बरोबरीने, अनिर्बंधपणे, कुठल्याही परवानगीशिवाय घेतले जाणारे नळजोड रोखणे हे ही तितकेच गरजेचे आहे. (Pune Municipal Corporation Water Complaint)
वडगावशेरीतील सर्वे नंबर 48/3 आणि 4 या संपुर्ण भागात गुंठेवारी बांधकामांचं प्राबल्य आहे. कमी जागेत केलेल्या जास्तीच्या बांधकामांमुळे भाडेकरू ठेवण्याचे प्रमाण प्रचंड आहे व त्यामुळे पाण्याची गरज सतत वाढती आहे. या वाढत्या गरजेपोटी, स्थानिक प्लंबर्सना हाताशी धरून बेकायदेशीर नळजोडण्या घेण्याची पद्धत अगदी पहिल्यापासून जणु काही राजमान्यचं आहे. (Pune Municipal Corporation Water supply)
या वर्षीच्या कमी पावसामुळे आणि संभाव्य पाणीकपातीच्या शक्यतेने भाडेकरू लोकांना पाणी  कमी पडेल या भीतीने धास्तावलेल्या अनेक घरमालकांनी मागील दोन महिन्यात सर्रास बेकायदेशीर नळजोडण्या घेण्याचा सपाटा लावला आहे. या अचानकपणे वाढलेल्या नळ जोडण्यांमुळेच,  मुख्य वाहिनीपासून दूर असलेल्या निवडक घरांना पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ आलेली आहे.
विनिर्दिष्ट भागात अपुऱ्या पाणीपुरवठयाची इतर तांत्रिक कारणे शोधणे व ती नाहीशी करणे तसेच घरटी एकापेक्षा जास्त घेतलेल्या बेकायदेशीर नळ जोडण्यांवर कडक कारवाई करणे या गोष्टी नागरिकांना  तक्रारीच्या अनुषंगाने अपेक्षित आहेत.
9 जानेवारी 2024  या दिवशी ‘PMC CARE’ या संकेतस्थळाद्वारेही याबाबत नागरिकांनी  तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता पण टोकन नंबर मिळाला नाही व तक्रार अवस्था ही अद्यापही  “Registering” अशी येत आहे. महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा नागरिकांना असा फटका बसत आहे.