Youth Congress Agitation Against PM | पीएम ‘कॉम्प्रमाईज’ असल्याचा आरोप; युवक काँग्रेसचे गुडलक चौकात आंदोलन

HomeBreaking News

Youth Congress Agitation Against PM | पीएम ‘कॉम्प्रमाईज’ असल्याचा आरोप; युवक काँग्रेसचे गुडलक चौकात आंदोलन

Ganesh Kumar Mule Feb 21, 2026 7:40 PM

Pune Children Festival 2025 | पुणे बाल महोत्सवाचे उद्घाटन | यावर्षी उत्सवाची संकल्पना  “कमी स्क्रीन, अधिक खेळ”
BJP Pune | 1 हजार जुन्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांचा किंवा कुटुंबीयांचा सन्मान करण्यात येणार  | वर्धापनदिनानिमित्त शहर भाजपचा स्नेह-मेळावा
Pune PMC News | मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्येबाबत आढावा बैठक | राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचा 6 ते 8 ऑगस्ट रोजी दौरा

Youth Congress Agitation Against PM | पीएम ‘कॉम्प्रमाईज’ असल्याचा आरोप; युवक काँग्रेसचे गुडलक चौकात आंदोलन

Pune Breaking News – (The Karbhari News Service) – AI Summit दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये देशाचे पंतप्रधान अमेरिकेच्या दबावाखाली ट्रेड डील व इतर करार करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे डेक्कन येथील गुडलक चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. “PM is Compromised” हा मुद्दा घेऊन युवक काँग्रेस देशभर आंदोलन करत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. (Pune News)

Epstein फाइल्समधील कथित खुलासे, माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या पुस्तकातील उल्लेख, तसेच संसदेत या विषयांवर चर्चा टाळली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. केंद्र सरकार देशहिताचे प्रश्न टाळत असून अमेरिकेसोबतच्या ट्रेड करारांमुळे देशाचे आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.
युवक काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, AI Summit दरम्यान शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली असून अनेकांना ताब्यात (डिटेन) घेण्यात आले आहे. राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चीब यांनाही अटक करून कोणतीही स्पष्ट कारणे न देता डिटेन केल्याचा आरोप करण्यात आला. अद्याप काही पदाधिकाऱ्यांची सुटका झालेली नसल्याचेही सांगण्यात आले.

हे आंदोलन महाराष्ट्राचे प्रभारी अजय चीकारा व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. त्यानंतर सहप्रभारी शांभवी शुक्ला यांनी “PM कॉम्प्रमाईज आहेत हे देशाला कळण्यासाठी युवक काँग्रेस संपूर्ण देशभर आंदोलन करेल,” असे सांगितले.

यावेळी सरचिटणीस प्रथमेश आबनावे, पुणे शहराध्यक्ष सौरभ आमराळे, पुणे जिल्हा अध्यक्ष उमेश पवार, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष कौस्तुभ नवले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

——–

“देशाच्या पंतप्रधानांनी अमेरिकेच्या दबावाखाली ट्रेड डील करून देशहिताला तिलांजली दिल्याचा गंभीर प्रश्न आम्ही उपस्थित केला आहे. संसदेत चर्चा न करता मुद्दे दडपले जात आहेत. जनतेच्या हितासाठी आम्ही आंदोलन केले; मात्र शांततेत आंदोलन करूनही आमच्या पदाधिकाऱ्यांना डिटेन करणे हे लोकशाहीविरोधी आहे.”

| प्रथमेश आबनावे (सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस) 


“लोकशाही मार्गाने प्रश्न विचारणे हा आमचा अधिकार आहे. सरकार उत्तर देण्याऐवजी दडपशाही करत आहे. सत्य बाहेर येईपर्यंत युवक काँग्रेस आंदोलन सुरू ठेवेल.”

| सौरभ आमराळे (शहराध्यक्ष, पुणे शहर युवक काँग्रेस)

——–

“देशहिताच्या गंभीर मुद्द्यांवर संसदेत चर्चा टाळली जात आहे, म्हणून युवक रस्त्यावर उतरले आहेत. शांततापूर्ण आंदोलनावर कारवाई म्हणजे लोकशाहीचा गळा घोटणे आहे.”

| उमेश पवार (अध्यक्ष, पुणे जिल्हा युवक काँग्रेस) 

———

“सरकारने पारदर्शक भूमिका जाहीर करावी; आंदोलन दडपून प्रश्न संपणार नाहीत. युवक काँग्रेस देशहितासाठी लढा सुरूच ठेवणार आहे.”

| कौस्तुभ नवले (अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेस)

आंदोलनादरम्यान काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

विवेक कडू, कुणाल काळे, यश कोलते, अक्षय नवगिरे, ऋषिकेश थोरात, सागर धाडवे, आनंद दुबे, सद्दाम शेख, निखिल मलके, रमेश सातपोते, निखिल मलके, मेघशाम धर्मावत, प्रदीप मेहकरे, विकास सुपणर, चैतन्य जयभाये, स्वप्नील बनसोडे, रोहित पाटोळे, स्वरूप केदारी, वीरधवल गाडे, गणेश सहाणे, औदुंबर आगलावे, स्वप्नील शेलार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: