PMC IT Department | पुणे महापालिका अजून होणार हायटेक! (High-tech PMC) | कामकाजात आणखी गतिमानता आणली जाणार
PMC IT Department – (The Karbhari News Service) – संगणकीय कामकाजाच्या बाबतीत पुणे महापालिका (Pune Municipal Corporation (PMC) ही राज्यातील सर्वात स्मार्ट महापालिका समजली होते. कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता आणण्यासाठी सर्व सुविधांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. आता PMC ने अजून एक पाऊल पुढे जात हायटेक होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विविध योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar IAS) यांनी बजटच्या माध्यमातून यासाठी निधी देखील उपलब्ध करून दिला आहे. (Pune PMC News)
पुणे महापालिकेचे बरेचसे काम हे पेपरलेस सुरु आहे. महत्वपूर्ण विभागात संगणकीय प्रणाली वापरून कामकाज केले जाते. त्यामुळे नागरिकांना सुलभ पद्धतीने सुविधा मिळत आहेत. मागील वर्षी महापालिकेने आपले संकेतस्थळ अद्ययावत केले. त्यामुळे नागरिकांना वापरणे सोयीचे होत आहे. तसेच WhatsApp Chat BOT ची सुविधा निर्माण करून दिली आहे. ज्यात विविध बिल, दाखले, ना हरकत प्रमाणपत्र, परवाना काढणे अशा 20 गोष्टींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे राजीव गांधी प्राणिसंग्रहालय साठी स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आली असून ऑनलाईन तिकीट बुकिंग प्रणाली विकसित केली आहे. हेरिटेज वॉक साठी ऑनलाईन शुल्क प्रणाली सुरु केली आहे. PMC Care Mobile App तयार करण्यात आला आहे. शहरी गरीब योजनेसाठी ऑनलाईन प्रणाली राबवण्यात आली आहे. अशा विविध गोष्टींचा नागरिकांना चांगला फायदा होताना दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काळात अजून प्रणाली राबवून महापालिका हायटेक बनवण्याचा महापालिका प्रशासनाचा मानस आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाला त्यासठी आगामी बजेट मध्ये 45 कोटी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
– या असतील नवीन योजना
– Propety Tax Software विभागाकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन संगणक प्रणाली विकसित करण्याचे कामकाज प्रस्तावित आहे.
– पुणे मनपाच्या विविध विभाग व नगरसचिव विभागाकडील सन १९५० पासूनचे सर्व जुने व महत्वाचे दस्त, नस्ती, नोंदी, अभिलेख, विविध समिती निर्णय इत्यादी महत्वाचे रेकोर्ड स्कॅनिंग करुन डिजिटल स्वरुपात जतन करणे.
– ई-office अंमलबजावणी (eFile Implementation) :- प्रशासकीय कामकाज गतिमान व्हावे, सुसूत्रता यावी, दस्तऐवज सुरक्षित राहावेत व माहिती जलदगतीने प्राप्त होऊन निर्णय प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी ई-ऑफिस प्रणालीचा वापर प्रभावीपणे करणे.
– पुणे महानगरपालिकेतील सेवकांच्या माहितीचे संगणक प्रणालीद्वारे व्यवस्थापन करणे, सेवकांचे वेतन बिले अदा करणे व सेवक निवृत्त झाल्यावर सेवानिवृत्त वेतन अदा करण्याची संगणक प्रणाली एकमेकांना जोडून अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित तयार करणे त्यासाठी विकसनाचे कामकाज चालू आहे.
– डिजिटल हस्ताक्षर (Signature-e) :– पुणे मनपामार्फत विविध प्रकारचे दाखले, परवानगी प्रमाणपत्र नागरिकांना देण्यात येतात. सदर दाखल्यांवर डिजिटल स्वरुपात संबंधित अधिकाऱ्यांची स्वाक्षरीकरिता डिजिटल स्वाक्षरीची सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
– Digital Locker System अंमलबजावणी :-
पुणे महानगरपालिकेमार्फत विविध प्रकारची प्रमाणपत्रे जसे विवाह नोंदणी प्रमाणपत्र, जन्म-मृत्यु प्रमाणपत्रे इ. सेवा नागरिकांना देण्यात येतात. विवाह नोंदणी प्रमाणपत्राचे Digital स्वरुपात Digilocker या सेवेसोबत इंटिग्रेशन प्रायोगिक तत्वावर करण्यात आले असून तसे इतर प्रमाणपत्रे Digilocker द्वारे नागरिकांना देण्याचे प्रस्तावित आहे.
पुणे महानगरपालिकेमार्फत विविध प्रकारची प्रमाणपत्रे जसे विवाह नोंदणी प्रमाणपत्र, जन्म-मृत्यु प्रमाणपत्रे इ. सेवा नागरिकांना देण्यात येतात. विवाह नोंदणी प्रमाणपत्राचे Digital स्वरुपात Digilocker या सेवेसोबत इंटिग्रेशन प्रायोगिक तत्वावर करण्यात आले असून तसे इतर प्रमाणपत्रे Digilocker द्वारे नागरिकांना देण्याचे प्रस्तावित आहे.
– e-sparrow :– पुणे मनपाच्या अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमुल्यमापन अहवाल/गोपनीय अहवाल यांचे पदोन्नती प्रक्रियेत करताना वेळोवेळी विचारात घेतले जात असल्याने कार्यमुल्यमापन अहवाल लिहिण्यासाठी
त्यांचे सुयोग्यपणे जतन करणे कामी sparrow-e संगणक प्रणालीचे कामकाज प्रस्तावित आहे.
त्यांचे सुयोग्यपणे जतन करणे कामी sparrow-e संगणक प्रणालीचे कामकाज प्रस्तावित आहे.
– Backup Solution :- प्रशासकीय कामकाजासाठी विकसित केलेल्या विविध ऑनलाईन संगणक प्रणालींची संगणकीय माहिती सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जतन करणे गरजेचे व अत्यावश्यक असल्याने सद्यस्थितीत अस्तित्वात असलेला सर्व संगणक प्रणालींच्या डाटाचा बॅकअप घेण्याचे कामकाज सुरु आहे.
– नवीन ३४ गावांमध्ये नेटवर्क व्यवस्था करणे :– नव्याने होणारे प्रशासकीय कामकाज, नागरी सुविधा अंतर्गत होणारे कामकाज वाढणार असून तेथे नेटवर्क व्यवस्था LAN कनेक्टीव्हिटी देणे आवश्यक आहे.
सर्व ग्रामपंचायतींमधील कार्यालय Data Lease Line (१:१) द्वारे मुख्य भवनला जोडण्यात येणार असून पुणे मनपातील Infrastructure Network व्यवस्थेद्वारा त्यांना इंटरनेटची सुविधा पुरविण्यात येणार आहे.
सर्व ग्रामपंचायतींमधील कार्यालय Data Lease Line (१:१) द्वारे मुख्य भवनला जोडण्यात येणार असून पुणे मनपातील Infrastructure Network व्यवस्थेद्वारा त्यांना इंटरनेटची सुविधा पुरविण्यात येणार आहे.
– बॅकअप डाटा लीज लाईन :- ई-गव्हर्नन्स प्रकल्पाचा मोठ्याप्रमाणात वापर होत असून त्याद्वारे संगणक प्रणालीतून मोठ्याप्रमाणात माहितीची देवाणघेवाण करण्यात येते. सद्यस्थितीत ही सर्व कार्यालय १० mbps व ४ mbps या बँडविड्थने Data Lease Line (१:१) जोडण्यात आली असून गतिमान प्रशासकीय कामकाजासाठी तसेच अखंडितपणे कामकाज चालू ठेवण्यासाठी Backup Lease Line द्वारे SD-WAN द्वारा एकत्रितपणे 20 mbps ची बँडविड्थ सर्व कार्यालयांना उपलब्ध होणार आहे.
—-