Pune Municipal Corporation Latest News | महापालिका कर्मचाऱ्यांनी मालमत्ता विवरणपत्र सादर करण्याबाबत अतिरिक्त आयुक्तांचे नवीन आदेश | जाणून घ्या
Pune PMC News – (The Karbhari News Service) – महापालिका कायद्यानुसार पालिकेच्या १ ते ३ ऱ्या गटातील सर्व कामगार व अधिकाऱ्यांना त्यांच्या मालमत्तेचा तपशील सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दरवर्षी ३१ मे पूर्वी ही माहिती द्यावी लागते. त्यानुसार वर्ग १ ते ३ मधील अधिकारी/कर्मचारी यांनी त्यांचे मालमत्ता व दायित्वाबाबतचे विवरण पत्र सादर करणेबाबत आदेशित करण्यात आले होते. त्यानुसार सर्व खातेप्रमुखांनी कार्यवाही करावयाची आहे. असे आदेश अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)
– महापालिका कायद्यानुसार तपशील देणे बंधनकारक आहे
महानगरपालिकेच्या इमारतीत आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 20 हजारांहून अधिक कामगार काम करतात. श्रेणी 1 ते श्रेणी 4 कर्मचारी यामध्ये काम करतात. राज्य सरकारच्या सूचनेनुसार श्रेणी 4 वगळता सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या मालमत्तेचा तपशील देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याअंतर्गत महापालिका त्यावर अमल करत आहे. या तपशिलाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना महापालिकेच्या प्रत्येक विभागाला देण्यात आल्या आहेत. तरीही त्यांच्या मालमत्तेचा तपशील महापालिका कर्मचारी व अधिकारी मांडत नाहीत.
– काय म्हटले आहे आदेशात?
प्रशासन विभागाने वर्ग-१ मधील सर्व अधिका-यांनी त्यांची मत्ता व दायित्वाबाबतची विवरणपत्रे त्यांचे नियंत्रक असलेल्या अतिरिक्त महापालिका आयुक्त यांचे मार्फत महापालिका आयुक्त यांचेकडे सादर करणे बाबत सूचित करण्यात आले आहे. तरी सर्व वर्ग-१ मधील अधिकाऱ्यांनी त्यांची मत्ता व दायित्वाबाबतची विवरणपत्रे वेळेत सादर करावी. सादर केलेले वर्ग १ मधील अधिकाऱ्यांचे विवरणपत्र जतन करण्याची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागाकडील आस्थापना विभागाने करावी.
प्रत्येक मनपा अधिकारी / कर्मचा-यांनी (वर्ग ४ मधील कर्मचारी वगळता) मनपा सेवेतील कोणत्याही पदांवरील नियुक्तीद्वारे त्याच्या प्रथम सेवा प्रवेशाच्या वेळी, अशा नियुक्तीच्या दिनांकापासून २ महिन्याच्या कालावधीत मत्ता व दायित्वे याबाबतची विवरणपत्र विहित सादर करावे.
वर्ग २ व ३ मधील अधिकारी / कर्मचा-यांनी त्यांची मत्ता व दायित्वाबाबतची विवरणपत्रे ते सध्या कार्यरत असलेल्या खात्यांच्या खातेप्रमुखांकडे सादर करावे.
वर्ग २ व ३ मधील अधिकारी / कर्मचा-यांनी त्यांची मत्ता व दायित्वाबाबतची विवरणपत्रे ते सध्या कार्यरत असलेल्या खात्यांच्या खातेप्रमुखांकडे सादर करावे.