PMC Employees Identify | पुणे महापालिकेतील कायम कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे आता वेगवेगळी असणार!  | फसवणूक टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाचा निर्णय 

HomeBreaking Newsपुणे

PMC Employees Identify | पुणे महापालिकेतील कायम कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे आता वेगवेगळी असणार! | फसवणूक टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाचा निर्णय 

गणेश मुळे Jul 20, 2024 1:34 PM

PMC Contract Employees Bonus | महापालिकेतील कंत्राटी कामगारांना बोनस देण्याची मागणी
IAS Vikram Kumar | PMC Contract Employees | कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांबाबत पुणे महापालिका सकारात्मक | मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला विश्वास
PMC Contract Employees Portal | कंत्राटी कामगारांसाठी स्वतंत्र पोर्टल तात्काळ सुरू करा | सुनिल शिंदे यांची महापालिका प्रशासनाकडे मागणी

PMC Employees Identify | पुणे महापालिकेतील कायम कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे आता वेगवेगळी असणार!

| फसवणूक टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाचा निर्णय

PMC Employees – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेची (Pune Municipal Corporation (PMC) सुरक्षितता व नागरिकांची होणारी संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी कायम सेवकांची (PMC Employees) व एकवट मानधनावरील कर्मचाऱ्यांची/ठेकेदाराकडील कंत्राटी कामगारांची ओळखपत्रे भिन्न स्वरुपाची असणे आवश्यक आहे. त्यामुळे  पुणे महानगरपालिकेच्या एकवट मानधनावरील कर्मचाऱ्यांना व ठेकेदाराकडील नेमलेल्या कंत्राटी कामगारांना वेगळी ओळखपत्र दिली जाणार आहेत. त्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी जारी केले आहेत. (Pune PMC News)
पुणे महानगरपालिकेकडून नेमलेल्या एकवट मानधनावरील कर्मचाऱ्यांना व ठेकेदाराकडील कंत्राटी कामगारांना देण्यात आलेली ओळखपत्रे आणि महानगरपालिकेच्या आस्थापने वरील कायम अधिकारी/कर्मचारी यांना देण्यात आलेली ओळखपत्रे एक समान असल्याचे सुरक्षा विभागाद्वारे मुख्य प्रवेशद्वारावर नागरिकांची व सेवकांची तपासणी केली असता निदर्शनास आले आहे. यात महापालिकेची फसवणूक होऊ शकते. तसेच सुरक्षिततेचा देखील प्रश्न आहे. त्यामुळे ओळखपत्र बाबत नियमावली तयार करण्यात आली आहे.
एकवट मानधन व ठेकेदाराकडील कंत्राटी कामगारांना देण्यात येत असलेल्या ओळखपत्राबाबत अशी असणार नियमावली
(१) एकवट मानधनावरील व ठेकेदाराकडील कंत्राटी कामगारांना द्यावयाच्या ओळखपत्रावर महानगरपालिकेचे नाव व बोधचिन्ह असता कामा नये. एकवट मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्राच्या पट्टीचा (लेस) रंग काळा असावा तसेच संबंधित मनपाचा सेवक असलेचे भासवणारे ओळखपत्र नसावे.
२) एकवट मानधनावरील व ठेकेदाराकडील कंत्राटी कामगारांच्या ओळखपत्रांच्या पट्टीवर (लेसवर) महानगरपालिकेचे नाव व बोधचिन्ह असता कामा नये.
३) एकवट मानधनावरील कर्मचाऱ्यांना संबंधित खातेप्रमुखांनी तात्पुरत्या स्वरूपाचे ओळखपत्र द्यावे.
४) एकवट मानधनावरील कर्मचाऱ्यांना संबंधित खातेप्रमुखांनी तात्पुरत्या स्वरूपाचे ओळखपत्र नमुन्याप्रमाणे मुद्रणालयाकडून तयार करून घ्यावे व त्याचा खर्च संबंधितखात्याच्या बजेटहेड वरून अदा करण्यात यावा.
५) एकवट मानधनावरील कर्मचाऱ्यांनी मुदत संपलेनंतर खातेप्रमुखांकडे ओळखपत्र जमा करणे आवश्यक राहील.
६) एकवट मानधनावरील कर्मचाऱ्याचे प्रत्येक नियुक्तीचे वेळी सेवाखंड दिलेची खात्री करून मुदत नमूद करावी.
७) ठेकेदाराकडील कंत्राटी कामगारांना नियुक्त करणाऱ्या ठेकेदाराने त्याचे नाव व बोधचिन्हासह ओळखपत्र स्वखर्चाने द्यावे.
८) ठेकेदाराकडील कंत्राटी कामगारांना द्यावयाच्या ओळखपत्रावर महानगरपालिकेचे नाव व बोधचिन्ह असता कामा नये. ठेकेदाराकडील कंत्राटी कामगारांच्या ओळखपत्राच्या पट्टीचा(लेस) रंग हिरवा असावा. तसेच संबंधित मनपाचा सेवक असलेचे भासवणारेओळखपत्र नसावे.
९) ठेकेदाराकडील कंत्राटी कामगारांच्या ओळखपत्रांवर “कंत्राटी” अशी मोठ्या व ठळक अक्षरात नोंद असावी.
१०) कंत्राटी कामगारांच्या ओळखपत्रावर त्यांच्या नियुक्तीच्या मुदतीचा समावेश करावा.
११) ओळखपत्राचा गैरवापर केल्यास फौजदारी कारवाईबाबत सक्त ताकीद त्यात नमूद करावी.
१२)  दोन्ही ओळखपत्र अहस्तांतरणीय असतील.
१३) ओळखपत्रांचा गैरवापर होणार नाही याची दक्षता संबंधित खातेप्रमुख व ठेकेदार यांनी घ्यावी.