PMC Employees Union | PMPML | पी एम सी एम्प्लॉईज युनियनच्या पुढाकाराने पुणे महानगरपालिकेतील सेवकांसाठी बस सेवा सुरु

HomeपुणेBreaking News

PMC Employees Union | PMPML | पी एम सी एम्प्लॉईज युनियनच्या पुढाकाराने पुणे महानगरपालिकेतील सेवकांसाठी बस सेवा सुरु

गणेश मुळे May 30, 2024 3:29 PM

PMC Women Employees | पुणे महानगरपालिकेतील महिला अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी महाभोंडल्याचे पी एम सी एम्प्लॉईज युनियन तर्फे आयोजन
PMC Employees Suspension | कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याआधी त्यांना प्राथमिक सुविधा द्या | पीएमसी एम्प्लॉईज युनियन ची आयुक्तांकडे मागणी
PMC Employees Union | पीएमसी एम्प्लॉईज युनियन कडून महापालिकेत दिवाळी फराळ वाटप! | दिव्यांग विद्यार्थी व मनपा तृतीयपंथी सेवकांना वितरण

PMC Employees Union | PMPML | पी एम सी एम्प्लॉईज युनियनच्या पुढाकाराने पुणे महानगरपालिकेतील सेवकांसाठी बस सेवा सुरु

 

PMC Employees Union – (The Karbhari News Service) – पी एम सी एम्प्लॉईज युनियन पुढाकाराने पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation (PMC) सेवकांसाठी बस सेवा सुरु करण्यात आली आहे. पहिल्या टप्यात पुणे मनपा -विश्रांतवाडी -दिघी -आळंदी बस क्रमांक 119 सुरु करण्यात आली आहे. (PMPML Pune)

ही बस रोज सायं ६.२० मी पुणे मनपा भवन येथून सुटेल. याबाबत पी एम सी एम्प्लॉईज युनियनने पी एम पी एम एल व्यवस्थापक यांचे कडे पाठपुरावा करून सेवकांना बस सेवा उपलब्ध करून दिली आहे.

The Karbhari - PMC Employees Union

युनियन चे अध्यक्ष व पदाधिकारी यांचे हस्ते बस ला पुष्पहार घालुन वाहक व चालक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनपाचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी कैलास वाळेकर, युनियन अध्यक्ष बजरंग पोखरकर , उपाध्यक्ष विशाल ठोंबरे, सदस्य – संतोष रेंगडे , रवी टाकळे , जिजाभाऊ दातीर , दिनेश घुमे , मनीषा जाधव,सुधीर घारे ,भाऊ पाटील अमोल गोलांडे व इतर मनपा प्रवासी सेवक उपास्थित होते.

या वेळी पीएमपीएल व्यवस्थापक यांचे आभार मानून इतर मार्गावर ही मनपा सेवकांठी सहकार्य करण्याची विनंती केली. अनेक दिवसांपासूनची मागणीला यश आल्याबद्दल सेवकांनी समाधान व्यक्त करून खास करून महिला वर्गाला वेळेत घरी पोहचण्यासाठी मदत होणार आहे.