Pune Fire | NIBM संचालकांच्या शासकीय बंगल्याला पहाटे आग; बेडरूम-हॉल जळून खाक | कोंढवा खुर्द येथील घटना

HomeBreaking News

Pune Fire | NIBM संचालकांच्या शासकीय बंगल्याला पहाटे आग; बेडरूम-हॉल जळून खाक | कोंढवा खुर्द येथील घटना

Ganesh Kumar Mule May 25, 2026 8:21 AM

Monkeypox virus | PMC | मन्कीपॉक्स बाबत पुणे महापालिका सजग | नायडू हॉस्पिटलला सतर्क राहण्याच्या सूचना 
PMC Pune | Contract employee Bouns | मनपा कंत्राटी कामगारांचे आंदोलन | कंत्राटी कामगारांना बोनस देण्याबाबत आयुक्त यांच्यासोबत दोन दिवसांमध्ये बैठक घेण्याचे मनपा प्रशासनाचे आश्वासन
PMC Deep Clean Drive | डीप क्लिन ड्राईव्हच्या माध्यमातून एकूण ९२ टन ओला कचरा, १३३ टन सुका कचरा, ८३७ टन राडारोडा व ७७ टन पालापाचोळा संकलित | महापालिका प्रशासनाचे सकारात्मक पाऊल

Pune Fire | NIBM संचालकांच्या शासकीय बंगल्याला पहाटे आग; बेडरूम-हॉल जळून खाक | कोंढवा खुर्द येथील घटना

जीवितहानी नाही  | अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

Pune Fire News – (The Karbhari News Service) –  कोंढवा खुर्द येथील NIBM इन्स्टिट्यूटच्या ए टाईप बंगल्यात सोमवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. इन्स्टिट्यूटच्या संचालकांच्या शासकीय निवासस्थानी पहाटे 3 वाजून 50 मिनिटांनी आग लागली. या आगीत बंगल्यातील बेडरूम आणि हॉल पूर्णपणे जळून खाक झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.  (Pune Breaking News)
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साडेतीनच्या सुमारास बंगल्यातून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला कळवले. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
आगीने बेडरूम आणि हॉलला वेढले होते. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. ड्रायव्हर स्वप्नील कामठे, फायरमन सागर दळवी, निलेश वानखडे, हर्षद येवले, हर्ष खाडे आणि संदीप कवडे या पथकाने आग विझवण्यासाठी परिश्रम घेतले. आग पूर्णपणे नियंत्रणात आणल्यानंतरच पथक परतले.
आगीत बंगल्यातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर साहित्य पूर्णपणे जळाले आहे. बेडरूम आणि हॉलचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने त्यावेळी बंगल्यात कोणीही नव्हते, त्यामुळे जीवितहानी टळली. आग कशामुळे लागली याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाकडून घटनेची चौकशी सुरू आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेत घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणल्याने आजूबाजूच्या बंगल्यांपर्यंत आग पसरली नाही आणि मोठा अनर्थ टळला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: