Pune Congress | Pune Lok Sabha | पुणे काँग्रेस ची विजयाची तयारी पूर्ण! शहर अध्यक्षांची पदाधिकाऱ्या सोबत बैठक!
Pune Loksabha Election 2024 Results – (The Karbhari News Service) – उद्या लोकसभा निवडणूक मतमोजणी होणार आहे. यात पुणे काँग्रेस ला विजयाची पूर्ण खात्री आहे. त्यामुळे काँग्रेस ने विजयाची तयारी केली आहे.
त्या संदर्भात पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ब्लॉक अध्यक्ष व व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक कॉंग्रेस भवन येथे झाली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड,मा आमदार दिप्तीताई चवधरी, मा महापौर कमलताई व्यवहारे, मा नगरसेवक अजित दरेकर, मा नगरसेवक रफिक शेख, प्रदेश प्रतिनिधी महेबुब नदाफ यांच्या सह सर्व ब्लॉक अध्यक्ष,व पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे लोकसभेची निवडणूक ही मुख्यत्वे काँग्रेस अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर, महायुतीचे मुरलीधर मोहोळ आणि वंचितचे वसंत मोरे यांच्यात होती. Exit poll मध्ये पुण्याची जागा महायुतीच्या पारड्यात पडणार असे दाखवण्यात आले आहे. मात्र काँग्रेला पूर्ण विश्वास आहे कि, ही जागा आपणच जिंकणार आहोत. त्यामुळे काँग्रेस ने उद्याच्या विजयाची तयारी पूर्ण केली आहे. गुलाल, फटाके अशा सर्व गोष्टी तयार ठेवण्यात आल्या आहेत. निकाल लागल्यानंतर जल्लोष केला जाणार आहे. असे काँग्रेस च्या सूत्रांनी सांगितले.
—