Pune Congress | पुणे काँग्रेस कमिटीकडून उमेदवारी अर्ज स्विकारण्यासाठी मुदत वाढ
PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – आगामी पुणे महानगरपालिका निवडणुक लढविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचा उर्त्स्फुत प्रतिसाद बघता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज देण्याची व घेण्याची १५, १६ डिसेंबर असे दोन दिवस वाढवण्यात आलेली आहे. (Pune News)
या कालावधीत इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेऊन व भरून पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय, काँग्रेस भवन, शिवाजीनगर, पुणे ५ येथे सकाळी ११.०० ते सायं. ५.०० या कालावधीत जमा करावेत अशी माहिती या पत्रकाद्वारे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली आहे.

COMMENTS